जुन्नरचे पुढारी मोठे हुशार...वाद पेटण्याआधीच वादावर पाणी 

जुन्नर तालुक्‍यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्यातील वादामुळे शिरोली गाव राज्यभर चर्चेत आले. मात्र, या वादामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत होती. या वादात जुन्नरची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी अतुल बेनके यांनी पुढाकार घेत वादावर तोडगा काढण्यात यश मिळविले आहे.
जुन्नरचे पुढारी मोठे हुशार...वाद पेटण्याआधीच वादावर पाणी 
Settle on the dispute between Sherkar and Borhade in Shiroli

पुणे ः जुन्नर तालुक्‍यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्यातील वादामुळे शिरोली गाव राज्यभर चर्चेत आले. मात्र, या वादामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत होती.

या वादात जुन्नरची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी अतुल बेनके यांनी पुढाकार घेत वादावर तोडगा काढण्यात यश मिळविले आहे. आगामी काळात एकमेकांना सहकार्य करत राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. 

गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर सत्यशील शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे यांच्या वादाची चर्चा आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजूने आपापली बाजू मांडण्यात येत होती. दोन्ही गटाचे समर्थक आपापल्या बाजूने लिहीत होते. यादरम्यान काही मिम्सही येत होते.

सोशल मीडियामुळे हा वाद महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोचला. दोन दिवस फेसबुक आणि व्हाट्‌स अपवर याच वादाची चर्चा सुरू होती. यात राज्यातील राजकीय नेतेही सहभागी झाले होते. या वादाच्या दरम्यान फेसबुक लाईव्ह सुद्धा घेण्याचे प्रकार घडले. एकंदरीत हा वाद खूपच गाजत होता. 

काल अचानकपणे आमदार अतुल बेनके, सत्यशील शेरकर, अक्षय बोऱ्हाडे यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या फोटोमुळे या वादात भाग घेतलेल्यांची मात्र पंचाईत झाली. हा फोटो आजचा आहे की जुना? याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळातच आमदार बेनके, सत्यशील शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे यांचे व्हिडीओ आले. त्यात त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया 

हा शिरोली गावातील वाद होता, पण त्या वादाची चर्चा राज्यभर सुरू होती. गावातील लोकांनी एकत्र येउन हा वाद मिटवला आहे. सत्यशील शेरकर आणि अक्षय बोऱ्हाडे या दोघांनाही समजावून सांगितले आहे. त्यांच्यात संवाद झाला, हा वाद मिटावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. हा वाद मिटला आहे, याचा आनंद आहे. वाद मिटवण्यासाठी मी काही लोकांवर जबाबदारी दिली होती, ती त्यांनी पार पाडली. आता हा वाद मिटला आहे. 

-अतुल बेनके, आमदार 

अक्षयच्या घराचे आणि आमच्या घराचे दोन पिढ्यांपासून सलोख्याचे संबंध आहेत. मी लहानपणापासून त्याला ओळखतोय. अनेकदा त्याला मी मदतही केली आहे. त्याच्या कामाबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्याच्यात आणि माझ्यात गैरसमाजातून काही गोष्टी झाल्या. पण आता तो वाद मिटला आहे. आम्ही इथून पुढे एकत्रपणे गावाच्या विकासासाठी काम करणार आहोत. 

-सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखाना

सत्यशील दादा आणि माझ्यात गैरसमजातून वाद झाला होता. आज गावातील लोकांनी आमच्यातील गैरसमज दूर केले आहेत. या वादाच्या दरम्यान मला ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार. मला भेटायला जे मित्र येणार आहेत. त्यांनी आता येऊ नये. 

-अक्षय बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in