ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड (वय ७७) यांचे आजारपणामुळे आज सकाळी निधन झाले. गेले पंधरा दिवस खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.
Adv. Bhaskarrao Awhad Passes Away in Pune
Adv. Bhaskarrao Awhad Passes Away in Pune

पुणे : ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड (वय ७७) यांचे आजारपणामुळे आज सकाळी निधन झाले. गेले पंधरा दिवस खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय असलेले ॲड. आव्हाड महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्‍वस्त मंडळाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांचा विशवास बसेना. राज्यभरातून चौकशीचे फोन येऊ लागले. वकिली व्यवसायाबरोबरच विद्यार्थीदशेपासून कायद्याच्या विद्यार्थ्यांच्यासाठी १९६८ पासून ते पुण्यात क्लास घेत होते. एकेकाळी आव्हाड यांच्या एलएलबीच्या क्लाससाठी राज्याभरातून विद्यार्थी कायद्याच्या शिक्षणाला पुण्यात येत होते. राज्यातील हजारे वकील त्यांनी घडविले. कायद्याचा प्रचंड अभ्यास, साहित्यातील गद्व व पद्य लेखन तेवढ्याचे ताकदीने करीत होते. त्यांची अनेक पुस्तके व कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेबरोबरच अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. 'एमआयटी' च्या विश्‍वस्त मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.अनेक राजकारणी उद्योगपती तसेच व्यावसायिकांचे वकिली व्यवसायाच्या पलिकडे त्यांचे घरोब्याचे संबंध होते. पुण्यातील तसेच राज्यातील विविध सामाजिक संस्थांवर त्यांनी काम केले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी उममुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे या दोघांशी त्यांचा विशेष स्नेह होता. 

गोपीनाथ मुंडे तर त्यांचे विद्यार्थी होते. सत्तर-ऐंशीच्या दशकात पुण्यात कायद्याच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲड. आव्हाड हे हक्काचा आधार होते. विद्यार्थ्यांकडून ते क्लासचे शुल्क कधीच मागत नसत. विद्यार्थ्यांनी पैसे दिले तरच ते पैसे घेत. कायद्याचा गाढा अभ्यास असताना भारतीय प्राचीन वेदांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. या विषयावर ते रजायभर व्याख्यान देत होते.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com