अजित पवारच सर्वात जास्त भरवशाचे : संजय राऊत यांचे प्रशस्तीपत्रक

''अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा, असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर विरोधकांचे ऑपरेशन सुरू आहे,'' असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना प्रशस्तीपत्रक दिले आहे.
Sanjay Raut - Ajit Pawar
Sanjay Raut - Ajit Pawar

मुंबई : ''अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा, असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त भरवशाचे तेच आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना कुरतडून काही हाती लागेल काय यावर विरोधकांचे ऑपरेशन सुरू आहे,'' असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना प्रशस्तीपत्रक दिले आहे. 

राऊत यांनी दैनिक 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरात राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीचा आढावा घेतला आहे. ''सरकार किती टिकेल यावर आजही प्रश्न निर्माण केले जात आहेत. हे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी अमित शहा यांचे एक प्रगल्भ विधान समजून घेतले पाहिजे. ‘आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही.’ हेच सत्य आहे. यापैकी एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मध्य प्रदेश पिंवा राजस्थान पॅटर्न वापरायचा हे ठरवले, पण राजस्थान पॅटर्न फसला व मध्य प्रदेशात ‘सिंधिया’ पॅटर्न यशस्वी झाला.  संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल,'' असे राऊत यांनी या सदरात स्पष्ट केले आहे. 

एखाद्या नटीचे बेकायदेशीर बांधकाम पाडणे हे सध्याच्या काळात बेकायदेशीर ठरत आहे, तेथे बहुमतातील सरकार पाडण्याचे प्रयोग घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे असे बोलणे गुन्हा ठरू शकतो. अशा प्रवृत्तीविरोधात महाराष्ट्र म्हणून लढावे लागेल, असे सांगत राऊत म्हणतात,..."सरकार स्थापन होत असताना शिवसेनेचा एक आमदार भेटायला आला. फक्त 55 आमदार असताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे वारंवार सांगणे हास्यास्पद ठरेल. तुम्ही अडचणीत याल, असे त्याने कळकळीने सांगितले. त्याला उठताना एक लहानशी गोष्ट सांगितली ती शेवटी देतो व विषय संपवतो. स्पार्टन इतिहासात अशी एक गोष्ट आहे की, एकदा रणांगणावर निघताना सेनापतीने सैनिकांना जवळ बोलावून त्यांना आपल्या हाताने तलवारींचे वाटप केले. त्यातील एका सैनिकाच्या हाती तलवार गेली. ती दोन बोटे तोकडी होती. हे पाहून सैनिक निराश झाला. सेनापतीकडे जाऊन त्याने तक्रार केली. ‘‘इतरांपेक्षा मला तलवार आखूड मिळाली आहे.’’ तेव्हा सेनापती हसून म्हणाला, ‘‘गडय़ा, तलवार दोन बोटे आखूड, तोकडी असली म्हणून काय बिघडले? तू इतरांपेक्षा फक्त एकच पाऊल पुढे अधिक उचलून टाक म्हणजे पहा, तुझी हीच तलवार इतरांच्या बरोबरीची, किंबहुना त्यांच्याहून थोडी लांबच होईल.’’आजपासून वर्षभरापूर्वी सरकार स्थापनेच्या रणांगणावर माझी तलवार तोकडीच होती...असे सांगत राऊत यांनी या सदराचा शेवट केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com