पुणे : "राज्य सरकारने छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला आहे. जर तुम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवणे गरजेचे आहे. सारथी संस्थेबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे," असे खासदार संभाजीराजे यांनी आज सांगितले.
पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) स्थगित केलेला तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, यासाठी सहा दिवसांपासून तारादूत सारथीसमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. या आंदोलकांची भेट संभाजीराजे यांनी आज घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हरियानात राजकीय भूकंप टळला..उपमुख्यमंत्री चौटाला अन् राजनाथसिंहांचे गुफ्तगू #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #NarendraModi #BJP #NDA #RajanthSingh #DushyantChautala #JJP #Haryana #FarmersProstests #FarmLaws #Viral #ViralNewshttps://t.co/jxHw0Jnvku
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 12, 2020
संभाजीराजे म्हणाले, "सारथीसमोर बसून आंदोलन केलं होतं, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सारथीची स्वायत्तता कायम राहणार, अशा शब्द दिला होता. पण त्यांनी तो शब्द पाळला नाही. तारादूत प्रकल्प सरकारला कळला का नाही, असा प्रश्न आहे. हा प्रकल्प सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. याला स्वायत्तता कशी म्हणणार?"
"सारखी जिवंत ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांची आहे. आज पवारांचा वाढदिवस आहे. आमचं त्यांच्याकडे हेच मागणं आहे," असे संभाजी राजे म्हणाले. सारथी संस्थेचे प्रश्न महाविकास आघाडी संस्थेने लवकर सोडवावेत, अन्यथा, आम्हाला पुन्हा रस्त्यावर उरतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी दिला.
"समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यांना सारथीच्या कामकाजात सहभागी करून घेतलं पाहिजे. सारथी छत्रपती शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे, ही संस्था जगवणे, तिची स्वायत्तता टिकवणं ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे," असा शब्दात संभाजीराजे यांनी राज्य सरकारला सुनावले.
हेही वाचा : शरद पवारांच्या सासूरवाडीचा असाही दबदबा !
सोमेश्वरनगर (पुणे) : चौधरवाडीत पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगल्या जमिनीत ज्वारी, तर माळाला कुसळे उगवायची. परंतु गावाने एकी केली आणि गावाच्या जावयाचे घर गाठले. जावयाने सहकारी पाणीपुरवठा योजनांची स्थापना करायला लावली आणि अजित पवारांमार्फत गावाला फारसा त्रास न होता तीन योजना कार्यान्वित केल्या. यामुळे शंभर टक्के जिराईत असणारे गाव आज साठ-सत्तर टक्के बागाईत झाले आहे. जिथे ज्वारीसुद्धा होत नव्हती, तिथे गेली 15 वर्ष ऊस पिकत आहे. चौधरवाडी (ता. बारामती) या गावचे जावई दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आहेत. चौधरवाडी हे भारताचे कसोटीपटू (स्व.) सदू शिंदे यांचे गाव. त्यांच्या कन्या प्रतिभा शिंदे यांचा शरद पवार यांच्याशी 1 ऑगस्ट 1967 रोजी विवाह झाला. या शिंदे कुटुंबापैकी दोन कुटुंब चौधरवाडीत आजही राहत आहेत. मुख्यमंत्री असलेल्या पवारांकडे 1990 मध्ये लोक गेले आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. त्यानंतर लगेचच चौधरवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली.

