राजू शेट्टी आणि मी एकाच गावाला निघालोय; पण आमचे रस्ते वेगळे : खोत

माझे गुरू शरद जोशी. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच. मी, राजू शेट्टी असे शेकडो कार्यकर्ते शरद जोशींच्या तालमीत तयार झालो. शरद जोशी यांच्यामुळे आमच्यासारखी सामान्य कुटुंबातील पोरं प्रस्थापितांच्या विरोधात लढायला शिकली.
Raju Shetty and I went to the same village; But our roads are different
Raju Shetty and I went to the same village; But our roads are different

पुणे : "माझे गुरू शरद जोशी. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच. मी, राजू शेट्टी असे शेकडो कार्यकर्ते शरद जोशींच्या तालमीत तयार झालो. शरद जोशी यांच्यामुळे आमच्यासारखी सामान्य कुटुंबातील पोरं प्रस्थापितांच्या विरोधात लढायला शिकली,' अशी भावना आमदार सदाभाऊ खोत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त केली. 

"आज (ता. 5 जुलै) गुरुपौर्णिमेला शरद जोशी यांची आठवण येते,' असेही सदाभाऊ खोत म्हणाले. "शरद जोशी यांच्यामुळे शेतकऱ्यांची चळवळ उभा राहिली. त्या चळवळीत आम्हाला काम करता आले. शरद जोशींनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आवाज देण्याचे काम केले,' असे खोत म्हणाले. 

"राजू शेट्टी हे माझे जवळचे मित्र. आमची मैत्री एका नात्याने जोडली होती. ते जेव्हा खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांच्यासोबत मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना ओवाळले. मलाही त्यांनी ओवाळले आणि मला मिठी घालून त्या म्हणाल्या,"माझी ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. हिला दृष्ट लागू नये.' तो प्रसंग आणि ते शब्द आठवले की आजही अंगावर शहारे येतात. राजू शेट्टी यांच्या आईनी त्यांच्यावर जेवढे प्रेम केले, तेवढे प्रेम माझ्यावरही केले. माझ्या आईने माझ्यावर जेवढे प्रेम केले, तेवढे शेट्टी यांच्यावर केले,' असे खोत यांनी सांगितले. 

शेतकरी संघटनेत काही लोकांमुळे दुही निर्माण झाली आहे. त्याचा आमच्या दोघांच्या घरातील लोकांनाही त्रास झाला. त्यांच्या मनाला वेदना झाल्या. राजू शेट्टी आणि माझे नाते भावनेच्या पातळीवर होते. कसलेही वाद असतील, तर आम्ही दोघे एकत्र बसून मिटवत होतो. पण नंतर समज गैरसमज वाढत गेले. त्याचा चळवळीला फटका बसला,' असे खोत म्हणाले. 

"राजू शेट्टी आमदार होत आहेत, याचा आनंद वाटतोय. पण त्यांनी प्रस्थापित लोकांच्या दारात जायला नको होते. आमदारकी त्यांच्या दारात यायला हवी होती. पण तरीही ते सभागृहात येत आहेत, याचा आनंद आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची भाषा सभागृहात बोलली जाईल. त्यांनी जर शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला, तर मी सभागृहात त्यांची बाजू घेईन, 'असे खोत म्हणाले. 

भविष्यात आम्ही एक होऊ का? असे अनेकजण विचारतात, "राजू शेट्टी आणि मी एकाच गावाला निघालो आहोत. फक्त आमचे रस्ते वेगळे आहेत. दोघांचे मार्ग वेगळे आहेत; पण ध्येय मात्र एकच आहे,'असे खोत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com