अतिवृष्टीने बारामतीतील अनेक मर्यादा झाल्या स्पष्ट....

शहर व तालुक्यात बुधवारी (ता. 14) अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाने अनेक मर्यादा तर स्पष्ट केल्याच पण भविष्यात पुन्हा असे अस्मानी संकट आल्यास किती संकटे उदभवू शकतात याची झलकही दाखवली.
Rains prove limitations of Baramati
Rains prove limitations of Baramati

बारामती : शहर व तालुक्यात बुधवारी (ता. 14) अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाने अनेक मर्यादा तर स्पष्ट केल्याच पण भविष्यात पुन्हा असे अस्मानी संकट आल्यास किती संकटे उदभवू शकतात याची झलकही दाखवली. 

दुष्काळी समजल्या जाणा-या बारामती तालुक्यात असा पाऊस ऐतिहासिक असाच मानला जात आहे. बारामतीत 24 तासात 170 मि.मी. पावसाची नोंद झाली. सरकारी निकषानुसार एका दिवसात 65 मि.मी.हून अधिक पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी समजली जाते. या आकडेवारीवरुनच किती प्रचंड पाऊस या पट्ट्यात झाला याची कल्पना येते. 

शहरातील अनेक ओढे बुजलेले किंवा बुजवले असल्याने पाणी जायला जागा नसल्याने वाट दिसेल तिकडे पाणी घुसल्याने अचानक अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह निर्माण झाले. भिगवण रस्त्यावर अमरदीप हॉटेल परिसरातून पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्याला वाट काढून देण्यासाठी डिव्हाईडर फोडावा लागला, परिणामी एका हॉस्टिपटलच्या बेसमेंटमध्ये पाणी वेगाने घुसले. 

शहरातील जवळपास सर्वच बेसमेंटमध्ये पाणी आल्याने अनेकांची दाणादाण उडाली. अनेकांच्या मालाचे कागदपत्रांचे यामुळे नुकसान झाले. मोठा पाऊस झाला की बारामतीतील रस्त्यांवरही तळी साचतात, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्ते करताना कसलाही विचारच केलेला नसल्याची बाब दरवर्षी पावसाळ्यात समोर येते. 

गेल्या पावसाळ्यातील पुरानंतर वाहून गेलेली संरक्षक भिंत अजूनही उभी राहिली नसल्याने यंदाही पुराचे पाणी इस्ततः घुसले. पुर नियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन अनेकांनी घरे उभारतानाच त्यांना रोखले गेले असते तर अनेकांच्या घरात पाणी शिरण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. यंदा नदीची स्वच्छता करण्यात आली होती त्या मुळे पाणी वेगाने वाहून गेले, नुकसानीची तीव्रता त्या मुळे कमी झाली. 

कायमस्वरुपी निवारा केंद्र हवे......
विविध आपत्तीच्या काळात तसेच पालखी काळात वास्तव्यासाठी एक कायमस्वरुपी निवारा केंद्र उभारण्याची आता गरज निर्माण झाली आहे. एकाच वेळेस या निवारा केंद्रात लोकांची सोय करता आली पाहिजे, स्वच्छतागृहांसह वीज, पिण्याच्या पाण्याची सुविधा दिल्यास स्थलांतराच्या वेळेस त्याचा उपयोग होऊ शकेल. 

बारामती तालुक्यात बुधवारी (ता. 14) झालेला पाऊस मि.मी. मध्ये खालीलप्रमाणे. 
•    बारामती - 170  
•    उंडवडी क.प - 130 
•    सुपे - 140  
•    लोणी भापकर - 107  
•    माळेगांव कॉलनी - 138  
•    वडगांव निं - 130 
•    पणदरे - 109  
•    मोरगांव - 106  
•    लाटे - 115  
•    बऱ्हाणपूर - 154  
•    सोमेश्वर कारखाना - 127 
•    जळगांव क.प - 137  
•    होळ 8 फाटा - 124.4  
•    माळेगांव कारखाना - 97  
•    मानाजीनगर -  115  
•    काटेवाडी - 156 
•    अंजनगाव - 140  
•    जळगांव सुपे - 129 
•    के.व्ही.के - 132.6  
•    सोनगाव - 151 
•    कटफळ - 179  
•    सायंबाचीवाडी - 125  
•    चौधरवाडी - 82.3  
•    नारोळी - 64.6 
•    काऱ्हाटी - 69  
•    गाडीखेल - 166 
मिलिंद संगई, बारामती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com