पुरंदरचा धुरंदर जावई शिवदीप लांडे येणार पुस्तक रुपात

आत्मचरित्रांचे दालनात आणखी एक महत्त्वाचे पुस्तक समाविष्टहोण्यासाठी सज्ज झाले आहे.
shivdeep lande.jpg
shivdeep lande.jpg

सासवड शहर : यशस्वी अथवा महान व्यक्तीची आत्मचरित्रे नेहमीच प्रेरणादायी व महत्त्वाची माहिती जगा समोर आणणारी असतात. आत्मचरित्रांचे दालनात आणखी एक महत्त्वाचे पुस्तक समाविष्ट होण्यासाठी सज्ज झाले आहे.

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांच्या चाहत्यांना आता ते पुस्तक रुपात भेटणार आहेत. शिवदीप लांडे यांनी शुक्रवारी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करीत शनिवारी ऑनलाईन येऊन महत्वपूर्ण घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती.

हेही वाचा...

त्यांचे देशभरातील चाहते शुक्रवारी दिवसभर शिवदीप लांडे नेमकी काय घोषणा करणार याबाबत अटकळी बांधत होते. अखेर हा सस्पेन्स शनिवारी संपला आणि लांडे यांनी ही मोठी घोषणा केली. शिवदीप लांडे हे पुरंदरचे सुपुत्र तसेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.

शिवदीप लांडे म्हणाले, देशातील तरुणाई आज जरी माझ्याकडे हिरोच्या स्वरूपात पाहत असली. तरी मी कधीकाळी एक सामान्य माणूस होतो. सर्वांना आयुष्यात ज्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्या गोष्टींना मी देखील सामोरा गेलो आहे. आजकाल स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना विद्यार्थ्यांना जे नैराश्य येतं त्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी, आव्हांना सामोरं जाण्यासाठी काहीतरी करायला हवं या भावनेतून या पुस्तकाचा जन्म झाला आहे. 

हेही वाचा...

पुस्तकाला दिलेल्या नावातील लायन (सिंह) म्हणजे मी नसून तो माझ्या खांद्यावर असलेल्या अशोक स्तंभातील सिंह आहे. तो सिंह खांद्यावर येण्यामागे असलेली प्रेरणा अर्थातच माझी आई आहे. हे पुस्तक तिला समर्पित असून असे शेकडो शिवदीप तयार होण्यासाठी देशभरातील मातांना बळ देणारं हे पुस्तक आहे.

अनेकदा रडलो, सोडून द्यावं वाटलं पण ...
लांडे म्हणाले, हे पुस्तक लिहिताना माझा पूर्वायुष्य मी पुन्हा जगलो. ते अनुभव आठवताना अनेकदा रडू कोसळलं. कित्येकदा असंही वाटलं की हा नाद सोडून द्यावा. पण आत्महत्येपर्यंत नैराश्य भोगणाऱ्या नवीन पिढीचा विचार करून मी स्वतःला सावरलं आणि पुस्तक पूर्ण केलं. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांत ते वाचकांसाठी उपलब्ध असेल.

चित्रपट निर्मात्यांना दिला नकार
शिवदीप लांडे यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी अनेक वर्षांपासून अनेक निर्माते त्यांच्या मागे लागले होते. याबाबत लांडे म्हणाले, चित्रपटामध्ये नायकाला अवास्तव रंगवले जाते. त्यातून पैसे कमावणे हा हेतू असतो. पैशापेक्षा मला स्वतःला वास्तववादी स्वरुपात लोकांसमोर पेश करायला आवडेल. त्यामुळे मी निर्मात्यांना नकार देत पुस्तकाचा पर्याय निवडला आहे असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com