पूजाच्या आजीची वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार; राठोडांच्या अडचणी वाढणार

टीक टाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाने आता आणखी वेगळे वळण घेतले असून तिच्या आजी शांताबाई राठोड या तिच्या मृत्यू प्रकरणात फिर्याद देत आहेत. त्यांचा वानवडी पोलिस ठाण्यात जबाब सुरु असून लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे.
Pooja Chavan- Sanjay Rathod
Pooja Chavan- Sanjay Rathod

पुणे : टीक टाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाने आता आणखी वेगळे वळण घेतले असून तिच्या आजी शांताबाई राठोड या तिच्या मृत्यू प्रकरणात फिर्याद देत आहेत. त्यांचा वानवडी पोलिस ठाण्यात जबाब सुरु असून लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे नुकताच मंत्री पदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

पूजा चव्हाण हिचा गर्भपात झाला होता. त्यानंतर तिला यवतमाळमध्येच ठार करुन नंतर पुण्याला नेऊन फ्लॅटमधून खाली ढकलण्यात आले, असा गंभीर आरोप पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. तसेच संजय राठोड यांनी  पोहोरागडावर जाऊन आपल्या कृत्याची कबुली द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता त्या या प्रकरणात तक्रार द्यायला समोर आल्या आहेत. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील आहेत. 

दरम्यान, टीकटाँक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 'पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा,' अशी मागणी हा अर्जात करण्यात आली आहे. लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी आज लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.  भाजपच्या पुण्यातील नेत्या व खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनीही वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com