पुणे पालिकेच्या पदाधिकाऱ्याच्या घरात कोरोना

पुणे महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित महिला पदाधिकाऱ्याचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. यामुळे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना क्वारंटाइन व्हावे लागणार की काय, अशी भीती सतावत आहे.
pmc office bearer husband found corona positve
pmc office bearer husband found corona positve

पुणे : पुण्यातील कोरोनाचा पैलाव रोखण्याची रणनीती आखण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीला महापौरसह पदाधिकारी, अधिकारी सोमवारी (ता.26) हजर होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याच्या पतीलाच कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे या बैठकीला उपस्थित असलेले 30-35 पदाधिकारी, अधिकारी आता क्वारंटाइन व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सभागृहनेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह काही खातेप्रमुखांची बैठक सोमवारी दुपारी महापालिकेत झाली. दोन तासांच्या बैठकीत विविध मुद्दयांवर जोरदार चर्चा झाल्याने महापालिकेत या बैठकीची चर्चा होती. त्यानंतर रात्री पदाधिकारी महिलेच्या पतीचा तपासणीचा अहवाल आला आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. ही माहिती समजताच सारेच आवाक झाले. त्यानंतर तातडीने आरोग्य यंत्रणा हलली आणि महिला पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीचा निर्णय घेतला गेला. त्यावर महापालिकेने अधिकारी नेमून तपासणीचा धडाका लावला. तेव्हा, बैठकीला हजर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांसह साऱ्यांनी धीरही दिला. तरीही महापालिकेतील पदाधिकारी धास्तावले असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. 

कोरोनाची लागण असली तरी, या आजाराच्या रुग्णांचा मृत्यू हा हदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अवस्थमामुळेच पुढे येत असल्याची बाब महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सभागृहनेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे. कोरोनाच्या रुग्णांना अन्य जे काही आजार आढळून येत आहेत, त्याचे उपचार करा आणि रुग्णांना बरे करा; असा सल्लावजा सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

महापौर मोहोळ यांच्यासह महापालिकेत सर्व पदाधिकारी लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. त्यानिमित्ताने आपापल्या प्रभागांत छोटेखानी कार्यक्रमही घेण्यात येत आहे. त्याकरिता पदाधिकारी-नगरसेवक लोकांची गर्दी जमवत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारातून नगर रस्त्यावरील एक नगरसेविका आणि तिच्या पतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळेही महापालिका आणि राजकारण्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

शहरात आतापर्यंत कोरोनाचे 264 बळी 

कोरोनामुळे शहरात आतापर्यंत २६४ जणांचा बळी झाल्याची नोंद आहे. पहिल्यांदा कोरोनाचा कारण असले तरी, या मृतांमागे अन्य आजाराची कारणे आहेत. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत ५.३१ टक्के रुग्णांचा जीव जात असल्याचे पुढे आले आहे. सरासरी हे प्रमाण अडीच ते तीन टक्के अपेक्षित असतानाही ते जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्याचवेळा महापालिकेच्या विलगीकरण कक्षातील लोकांची गैरसोय होत आहेत,अशा तक्रारी आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com