जयंती आगरकरांची फोटो टिळकांचा : पडळकर झाले ट्रोल

आज महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंतीनिमित्त नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आ गोपीचंद पडळकर यांनी चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो लावून गोपाळ गणेश आगरकरांची जयंती साजरी केली,यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होऊ लागले
Padalkar Being Trolled on Social Media for wrong post
Padalkar Being Trolled on Social Media for wrong post

पुणे : थोर समाजसुधार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्टमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी चक्क लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा फोटो वापरला. साहजिकच नेटकऱ्यांना संधी मिळाली आणि पडळकर सोशल मिडियावर ट्रोल झाले. 

आज महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंतीनिमित्त नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य आ गोपीचंद पडळकर यांनी चक्क  लोकमान्य टिळकांचा फोटो लावून गोपाळ गणेश आगरकरांची जयंती साजरी केली,यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होऊ लागले. ट्रोल झाल्यानंतर त्यांनी आपले ट्विट डिलिट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.

गोपीचंद अवघड आहे समदं..!! फोटो टिळकांचा जयंती आगरकरांची..!! अशी प्रतिक्रिया देत आदर्की बुद्रुक चे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधवर यांनी पडळकरांवर निशाणा साधला. अनेक नेटकऱ्यांनीही पडळकरांना ट्रोल केले. त्यामुळे आपले पहिले ट्वीट डिलीट करुन पडळकरांनी आगरकरांना अभिवादन करणारे दोन नवे ट्वीट पोस्ट केले. 

काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. भाजपच्या राज्य नेतृत्वालाही याची दखल घ्यावी लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com