एकट्या पुणेकरांनी रिचवली महिनाभरात शंभर कोटींची दारु 

कोरोनाच्या संकटात राज्यात सुमारे दीड महिना मद्यविक्री बंद होती. महिनाभरापूर्वी राज्य सरकारने मद्यविक्रीस परवानी दिली आणि दुकानासमोर अक्षरशः रांगा लागल्या. या महिनाभराच्या मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत 775 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे, त्यात एकट्या पुणे जिल्ह्याचा वाटा शंभर कोटी रुपयांचा आहे.
एकट्या पुणेकरांनी रिचवली महिनाभरात शंभर कोटींची दारु 
One hundred crore worth of liquor sold in a month in Pune district

पुणे : कोरोनाच्या संकटात राज्यात सुमारे दीड महिना मद्यविक्री बंद होती. महिनाभरापूर्वी राज्य सरकारने मद्यविक्रीस परवानी दिली आणि दुकानासमोर अक्षरशः रांगा लागल्या. या महिनाभराच्या मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत 775 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे, त्यात एकट्या पुणे जिल्ह्याचा वाटा शंभर कोटी रुपयांचा आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकारने मार्च-एप्रिल महिन्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले. परंतु पुन्हा चार मेपासून मद्यविक्री सुरू करण्यात आली. दुकानांसमोरील रांगामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राज्य सरकारने मद्याची होम डिलिव्हरी देण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात मद्यविक्रीच्या होम डिलिव्हरीस प्रारंभ केला. राज्यातील सुमारे सात लाख ग्राहकांनी याचा लाभ घेत घरपोच मद्य खरेदी केली. 

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी परमिट रूम, बियर बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु या परमिट रूम आणि बियर बारमध्ये ग्राहकांना अन्न उपलब्ध करून देता येणार नाही किंवा या ठिकाणी बसता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. 
 

राज्यातील मद्यविक्रीची दुकाने (कंसात पुणे जिल्ह्यातील संख्या)

वाईन शॉप  1365 222
देशी दारू दुकाने 2820 215
बिअर शॉपी 3359 440
परमिट रूम, बियर बार 5974 462


मे महिन्यात होम डिलिव्हरीद्वारे मद्य खरेदी केलेले ग्राहक 

राज्य  6 लाख 69 हजार 763 
मुंबई महापालिका, उपनगर क्षेत्र  2 लाख 46 हजार 366 

वाईन शॉपसमोरील रांगा गायब 

मद्यविक्री सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतकेच नव्हे तर टोकन पद्धतही सुरू केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक मजूर मूळगावी परतले आहेत. तसेच, सध्या बहुतांश उद्योग-व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या उत्पन्नातही घट झाली आहे. तसेच, गेल्या महिनाभरापासून मद्यविक्री सुरू आहे. त्यामुळे सध्या वाईन शॉपसमोरील गर्दी ओसरल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाला दर महिन्याला सुमारे 2100 कोटींचा महसूल मिळतो. या तुलनेत मे महिन्यातील महसूल कमी आहे. मे महिन्यात मद्यविक्रीतून 776 कोटी आणि लायसन्स शुल्कमधून 213 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. 
- कांतिलाल उमाप, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in