शिक्रापूरच्या माजी सरपंचांवर खंडणीचा गुन्हा; पोलिस निरिक्षक तावसकरांची बोहनी - Offence Registered against Shikraput Sarpanch for Demanding Ransom | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शिक्रापूरच्या माजी सरपंचांवर खंडणीचा गुन्हा; पोलिस निरिक्षक तावसकरांची बोहनी

भरत पचंगे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

शिक्रापूरात दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला २५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर दवाखाना चालू देणार नाही असे म्हणून पैसे मागणारे शिक्रापुरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात काल (ता.२) रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्रापूर : शिक्रापूरात दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला २५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर दवाखाना चालू देणार नाही असे म्हणून पैसे मागणारे शिक्रापुरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात काल (ता.२) रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, रा. माळीमळा शिक्रापूर ता. शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. १० दिवसांपूर्वी २४ आक्टोबर रोजी शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व तुला शिक्रापूर गावच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, खोटया तक्रारी दाखल करू असे म्हणून पैसे मागितले, म्हणून शिक्रापुरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत रामेश्वर बंडगर (मुळ रा.सोईट, पो.धानोरा, ता.उमरखेड, जि.यवतमाळ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन खंडणीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयुर वैरागकर करीत आहेत. 

दरम्यान तावसकर यांनी  कालच आपला पदभार स्विकारताच दाखल झालेला हा पहिलाच खंडणीचा गुन्हा असून रामभाऊ सासवडे हे माजी सभापती मंगलदास बांदल यांचे जवळचे नातेवाईक असल्याने हे प्रकरण आता कसे वळण घेतेय त्याची उत्सुकता तालुक्याला असणार आहे.

अशा प्रकारे आणखी कोणास शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत कुणाकडूनही खंडणीची मागणी होत असल्यास नागरीकांनी निर्भयपणे शिक्रापुर पोलीस ठाणेस फोन क्र.02137-28633 यावर संपर्क करावा असे आवाहान शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या वतीने  करण्यात आले आहे.

'तो' पत्रकार नेमका कोण?
तक्रारदाराला डॉक्टरला रामभाऊ सासवडे यांच्यापर्यंत घेवून जाणारा एक पत्रकार होता, अशी माहिती पोलिस सूत्रांची आहे. पुढच्या कारवाईत हे पत्रकार महोदयही खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख