मेंढपाळांच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीच्या बापूराव सोलनकर यांचा पक्षाला घरचा आहेर

राज्यातील मेंढपाळांच्या प्रश्नाबाबत सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, या प्रश्नावर प्रसंगी मोर्चा काढण्याचा इशारा देत राष्ट्रवादीचे दौंड तालुक्याचे पक्ष निरिक्षक बापूराव सोलनकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे
NCP Leader From Baramati Writes Lettter to Own Party Minister about Shepherds Issues
NCP Leader From Baramati Writes Lettter to Own Party Minister about Shepherds Issues

बारामती : राज्यातील मेंढपाळांच्या प्रश्नाबाबत सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, या प्रश्नावर प्रसंगी मोर्चा काढण्याचा इशारा देत राष्ट्रवादीचे दौंड तालुक्याचे पक्ष निरिक्षक बापूराव सोलनकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राष्ट्रवादीचेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहीत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

'राज्यातील मेंढपाळ वणवण भटकत, ऊन,  वीज, वारा, पाऊस यांचा विचार न करता आपला जीव धोक्यात घालून मेंढ्या सांभाळत आहेत. वीज पडून अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत, अनेक मेंढपाळांनी जीव गमावला आहे. काही  लोक मेंढपाळांवर सातत्याने अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकरण घडत आहेत मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखले पाहिजेत अनेक ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले, होत आहेत दिवसेंदिवस हल्ले करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, मेंढपाळांनी कसे जगावे हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. सरकारने यापुढे हल्ले करणाऱ्यांना जरब बसेल, असे शासन केले पाहिजे, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,' असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

'रोज मेंढपाळांवरती प्रत्येक भागामध्ये हल्ले होताना समोर येत आहे. भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्या मेंढ्या चरण्यासाठी जात असताना स्थानिक गाव गुंडाकडून मेंढपाळांना मारहाण केली जाते मेंढपाळ त्यामध्ये जखमी होतात. अनेकांना अपंगत्व आले आहे माता भगिनींची छेडछाड केली जाते हे मेंढपाळांच्या बाबतीमध्ये राज्यभरात घडत आहे, यावर सरकार गांभीर्याने पाहत नाही, त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येत नाही,  ही पुरोगामी महाराष्ट्राच्या लोकशाहीला न शोभणारी गोष्ट आहे,' असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पत्रात ते पुढे म्हणतात, 'सामान्य माणसाच्या पाठीमागे सरकारने उभे राहण्याची आवश्यकता असताना एक ही मेंढपाळ कुटुंबाला सरकारमधील मंत्र्यांनी किवा आमदारांनी साधी भेट दिली नाही, वेळीच मेंढपाळांवरील हल्ले खोरांवर कारवाई तसेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजातील संघटनांची बैठक बोलावून  त्यावर विचार विनिमय करून  लॉकडाऊन नंतर मेंढपाळांचा भव्य मोर्चा मंत्रालयावर काढण्याचा येईल.,' या निवेदनावर संपतराव टकले, माणिकराव काळे यांच्या सह्या आहेत.

या आहेत मागण्या- 

१- गावातील शंभर जनावरांमागे चाळीस एकर गायरान असले पाहिजे, हा केंद्राचा कायदा आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी संघटीत प्रयत्न हवेत.


२- मेंढपाळांवरील हल्ल्यांच्या संदर्भात कडक कायदे करण्यासंबंधी लोकप्रतिनिधींवर दबाव वाढवला पाहिजे.


३- शेळीमेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून बंदिस्त मेंढपाळीला चालना दिली पाहिजे, कर्ज व विम्याचे संरक्षण मिळवून दिले पाहिजे.

४- मेंढपाळ व्यवसायाला दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com