शरद पवार यांची तब्येत उत्तम असल्याची सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर काल झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज त्यांची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला असून पवार अत्यंत प्रसन्न मुद्रेत असल्याचे या फोटोवरुन जाणवत आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काल झालेल्या शस्त्रक्रियेनंतर आज त्यांची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करतानाचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला असून पवार अत्यंत प्रसन्न मुद्रेत असल्याचे या फोटोवरुन जाणवत आहे. NCP Chief Sharad Pawar Health Good Informs MP Supriya Sule

दरम्यान काल रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचेही छायाचित्र सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केले होते. पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

त्या नंतर सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी पवार यांच्या तब्येतीबाबत समाजमाध्यमांवर माहिती देत लोकांची काळजी कमी केली. काल रात्री सुळे यांनी रुग्णालयातील विविध डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. पवार यांची तब्येत छान असल्याचे सुळे यांनी आज सकाळच्या आपल्या पोस्टमधून नमूद केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही काल माध्यमांना पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. NCP Chief Sharad Pawar Health Good Informs MP Supriya Sule

दरम्यान पवार यांना रुग्णालयात हलविल्याची बातमी आल्यानंतर अनेकांची चिंता वाढली होती. मात्र पित्ताशयातील खड्यामुळे त्यांना त्रास होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केल्यानंतर काही प्रमाणात लोकांनी निःश्वास सोडला होता. आज सकाळी पवार यांची तब्येत उत्तम असल्याचे सुळे यांनी जाहिर केल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com