माझे राजकीय वजन दखल घेण्याएवढे नक्कीच आहे : फडणवीस 

कोरोनाच्या काळात राजकारण करायचे नाही, ही आमची भूमिका आहे. मात्र, कोरोनाशी लढताना मंत्र्या-मंत्र्यांमध्ये, मंत्री आणि प्रशासन तसेच आघाडीतील तीन पक्षांमध्ये समन्वय नाही. अशावेळी जो नेतृत्व करीत असतो, त्याने समन्वय घडवून आणायचा असतो. मात्र, दुर्देवाने तसे घडताना दिसत नाही.
My political weight is definitely worth noting: Fadnavis
My political weight is definitely worth noting: Fadnavis

पुणे : "कोरोनाच्या काळात राजकारण करायचे नाही, ही आमची भूमिका आहे. मात्र, कोरोनाशी लढताना मंत्र्या-मंत्र्यांमध्ये, मंत्री आणि प्रशासन तसेच आघाडीतील तीन पक्षांमध्ये समन्वय नाही. अशावेळी जो नेतृत्व करीत असतो, त्याने समन्वय घडवून आणायचा असतो. मात्र, दुर्देवाने तसे घडताना दिसत नाही,' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 23) पुण्यात केली. 

कोरोनाशी लढताना माहिती लपविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. माहिती लपविण्याच्या नादात कोरोनाविरोधात लढण्यासाठी रणनिती चुकली तर ती आपल्या सर्वांसाठी महागात पडेल, त्यामुळे सरकारने माहिती योग्यरित्या समोर आणायला हवी. 

फडणवीस म्हणाले, ""समन्वय योग्य असेल तरच कोणतीही लढाई जिंकता येते. कोरोनाची स्थिती, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्यात काही कमतरता असतील तर त्या सरकारपर्यंत पोचविणे, या उद्देशाने पुणे आणि सोलापूरचा दौरा करीत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिका कोरोना प्रतिबंधासाठी चांगले काम करीत आहे. पालिकेने 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा महापालिकांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. पुण्यातल्या सुविधांचा विचार केला, तर चाचण्यांची संख्या आणखी वाढविता येऊ शकतात. चाचण्याची संख्या वाढविण्यासाठी राज्य सरकारला विनंती करणार आहे.

पुण्यात कोरोना प्रादुर्भावाचा दर गेल्या काही दिवसांत 18 टक्‍क्‍यांवर गेला आहे. त्यामुळे मृत्यू रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. मृत्यूदर रोखायचा असेल तर जास्तीत जास्त चाचण्या करायला हव्यात. पुणे आणि सोलापूरचा दौरा केल्यानंतर या जाणवलेल्या त्रुटी मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देणार आहे. सुदैवाने माझे वजन इतके आहे की राज्य सरकार त्याची नक्की दखल घेईल.'' 

पुण्यात प्रशासन चांगले काम करीत असले तरी खासगी रुग्णालयांच्या समन्वयामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे. रुग्णांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. एका कुटुंबातील दोघे-तिघांना उपचार घ्यावा लागला, तर दिवाळे निघते आहे. सरकार याचा विचार करताना दिसत नाही. रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णावर लक्ष ठेऊन कारवाई करायला हवी, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. 

मुंबईप्रमाणे खासगी रुग्णालयात पुण्यातही नागरिकांकडून भरमसाठ शुल्क घेण्यात येत असल्याच्या घटना कानावर येत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे, असे फडवीस यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com