यूपीएससीत महाराष्ट्राने मारली हाफ सेंचुरी; राज्यातून नेहा भोसले प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मागील वर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातील 54 जणांनी बाजी मारली आहे.
more than 50 students from maharashtra cleared upsc exam
more than 50 students from maharashtra cleared upsc exam

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९ मध्ये घेतलेला परीक्षेचा निकाल  ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यात देशभरातून ८२९ जणांनी यश मिळविले असून,  देशात प्रदीप सिंग याने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील नेहा भोसले हिने देशात १५वा क्रमांक मिळविला असून,  तिने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रातील  ५० पेक्षा अधिक जणांनी यात यश मिळवले आहे. 

देशभरातून नागरी सेवेसाठी ८२९ जणांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नेहा भोसले हिने देशात १५ वी रँक मिळविली आहे. या निकालात १८० आयएएस, २४ आयएफएस, १५० जणांची आयपीएस म्हणून निवड झाली आहे. सेंट्रल सिव्हिल ग्रुप ए साठी ४३८ व ग्रुप बी साठी १३५ जणांची निवड करण्यात आली आहे. खुल्या गटातून ३०४, इडब्लूएस ७८, ओबीसी २५१, एससी १२९ , एसटी ६७ उमेदवार निवडले गेले आहेत. 

'यूपीएससी'ने नागरी सेवा परीक्षा मागील वर्षी सप्टेंबरमध्ये घेतली होती. यानंतर यंदा फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत मुलाखती पार पाडल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे मुलाखतींचे वेळापत्रक काही काळ विस्कळीत झाले होते. 'यूपीएससी'ने पुन्हा वेळापत्रक जाहीर करून  उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करत आज निकाल जाहीर केला आहे.. 

यूपीएससीत यश मिळविलेले महाराष्ट्रातील उमेदवार (कंसात रँक) 
नेहा भोसले (१५), मंदार पत्की (२२), आशुतोष कुलकर्णी (४४) , प्रियंका किशोरे ( ६१), योगेश पाटील (६३), विशाल नरवडे (९१),  राहुल चव्हाण (१०९),  कुलदीप जंगम (१३५), नेहा देसाई (१३७), जयंत मंकाळे (१४३), अभयसिंग देशमुख (१५१), अश्विनी वाकडे (२००), सागर मिसाळ (२०४), महादेव गित्ते (२१०), कुणाल चव्हाण (२११), सचिन हिरेमठ (२१३),  सुमीत महाजन (२१४), सारांश महाजन (२२४), अविनाश शिंदे  ( २२६), शंकर गिरी (२३०), श्रीकांत खांडेकर (२३१), योगेश कापसे (२४९), गौरी पुजारी (२७५), प्रसाद शिंदे (२८७), आदित्य काकडे (३८२), निमीश पाटील (३८९), मयांक स्वामी (३९३), महेश गिते (३९९), कांतीलाल पाटील (४१८)  स्वप्नील पवार ( ४४८), ऋषिकेश देसाई (४८१), नवनाथ माने (५२७), प्रफुल्ल देसाई (५३२), विजयसिंहगराव गिते (५५०), समीर खोडे (५५१), सुरेश शिंदे (५७४), अभिनव इंगवले (६२४), प्रियंका कांबळे (६७०, निखील खरे (६८७), सौरभ व्हाटकर (६९५), अक्षय भोसले (७०४), अभिजीत सरकाते (७१०), प्रज्ञा खंदारे (७१९), संकेत धनवे (७२७), शशांक माने (७४३), निखील कांबळे (७४४), राहूल राठोड (७४५), सुमीत  रामटेके (७४८), निलेश गायकवाड (७५२), कुणाल सरोटे (७६५), अभय सोनकर (७६७), वैभव वाघमारे (७७१), सुनील शिंदे (८१२), हेमंत नंदनवार (८२२), स्वरूप दीक्षित (८२७). 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com