राजकारणात तीन 'एम' असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही - आमदार दिलीप मोहिते

राजकारणात आता करिअर राहिलेले नाही. तरुणांनी राजकारणाऐवजी उद्योगधंद्यात करिअर करायला हवे. राजकारणात मसल पॉवर, मनी पॉवर आणि मॅन पॉवर हे तीन 'एम' असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, अशी राजकारणाच्या सद्यस्थितीबाबत आमदार दिलीपराव मोहिते यांनी सातकरस्थळ (ता.खेड) येथे स्पष्ट भूमिका मांडली.
MLA Dilip Shinde In Pune District Program
MLA Dilip Shinde In Pune District Program

कडूस :  राजकारणात आता करिअर राहिलेले नाही. तरुणांनी राजकारणाऐवजी उद्योगधंद्यात करिअर करायला हवे. राजकारणात मसल पॉवर, मनी पॉवर आणि मॅन पॉवर हे तीन 'एम' असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, अशी राजकारणाच्या सद्यस्थितीबाबत आमदार दिलीप  मोहिते यांनी सातकरस्थळ (ता.खेड) येथे स्पष्ट भूमिका मांडली.

सातकरस्थळ ग्रामपंचायत हद्दीतील बालाजीनगर फेज १ मधील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे आमदार मोहिते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी सरपंच अजय चव्हाण, लोकनियुक्त सरपंच संजीवनी थिगळे, उपसरपंच धनश्री सांडभोर, भाग्यश्री राळे, वैशाली बांगर, वैशाली मारणे, कालिदास सातकर, साहेबराव सातकर, अॅड.गिरीश कोबल, खंडू थिगळे, जगन्नाथ राक्षे व ग्रामस्थ उपस्थित होते. या कामासाठी ग्रामपंचायतीने सुमारे बारा लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. 

अनेक तरुण, तरुणी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत आहेत, पण राजकारण आता पूर्वीसारखे राहिले नसल्याचा सल्ला त्यांनी तरुणाईला देत राजकारणात मनी, मसल आणि मॅन पॉवर महत्वाची असल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आमदार मोहिते यांनी मंदिरासमोर सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे तर जिल्हा परिषद सदस्य काळे यांनी ओपन स्पेस जिम मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

आगामी काळासाठी आमदार मोहिते यांची जुळवाजुळव?
सातकरस्थळचे माजी सरपंच व सलग वीस वर्षे ग्रामपंचायतीमध्ये असणारे अजय चव्हाण हे सध्या भाजपाच्या गोटात आहेत. सांडभोरवाडी-काळूस जिल्हा परिषद गटात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती निवडणूक लढवली होती. भाजपाच्या तालुकास्तरावरील सर्वच कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. परंतु, आमदार मोहिते यांनी भाषणातून चव्हाण यांचा 'स्वतःसाठी काहीही न मागणारे पण समाजासाठी सर्वकाही मागणारे कामसू व्यक्तिमत्त्व' असा उल्लेख करीत कामाची तोंडभरून स्तुती केली. यावरून आमदार मोहिते यांनी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जमवाजमव सुरू केली की काय? अशी कुजबुज सुरू झाली.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com