पुण्याहून नाशिकला पोचा अवघ्या दोन तासांत 

होणार होणार म्हणून गेली काही वर्षे चर्चेत असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या पुणे-नाशिक लोहमार्गास अखेर रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली. सुमारे 235 किलोमीटरचा हा लोहमार्गआहे. हा लोहमार्ग अस्तित्वात आल्यानंतर पुण्याहून अवघ्या दोन तासांत नाशिकला पोचता येणार आहे.
पुण्याहून नाशिकला पोचा अवघ्या दोन तासांत 
Ministry of Railways approves Pune-Nashik railway

पुणे  : होणार होणार म्हणून गेली काही वर्षे चर्चेत असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेल्या पुणे-नाशिक लोहमार्गास अखेर रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली. सुमारे 235 किलोमीटरचा हा लोहमार्ग असून त्यास आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर आणि सातपूर हा भाग जोडला जाणार आहे. हा लोहमार्ग अस्तित्वात आल्यानंतर पुण्याहून अवघ्या दोन तासांत नाशिकला पोचता येणार आहे. 

पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रस्ताव महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमआरआयडीएल) रेल्वे मंत्रालयाला पाठविला होता. त्याला दोन दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. मध्य रेल्वेने या प्रस्तावाला 10 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आहे. सेमी स्पीड असलेली ही रेल्वे दोन तासांत 235 किलोमीटरचे अंतर पार करू शकेल. तिचा वेग ताशी 250 प्रती किलोमीटरपर्यंत वाढविणे शक्‍य आहे. 

""माल वाहतुकीबरोबरच पुणे, नगर आणि नाशिकमधून येथून या रेल्वेला मोठ्या संख्येने प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल. पुण्याहून सुमारे पावणे दोन तासांतच प्रवासी नाशिकला पोचू शकतील. तसेच, स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार स्वतंत्र रेल्वे लाइन टाकून ती या मार्गाला जोडण्यात येईल. त्यातून महारेलला उत्पन्नाचे मोठे साधन मिळेल. आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर आणि सातपूर याबरोबरच पुणे-नाशिक दरम्यानची पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांनाही या रेल्वेने जोडणे शक्‍य होणार आहे,'' असे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार यांनी सांगितले. 

पुणे-नाशिक लोहमार्गास आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने मंजुरी देऊन आर्थिक तरतूद केल्यानंतर या लोहमार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वेसाठी सुमारे 1500 हेक्‍टर भूसंपादन करावे लागेल. या प्रकल्पालामुळे पुणे नाशिक महामार्गालगतच्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे 10 हजार हेक्‍टर शेतीला फायदा होईल. तसेच, तीन औद्योगिक वसाहतींनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मंजुरीकडे सर्वांचे लक्ष आहे. 

असा असेल प्रकल्प 

►पुण्यातून हडपसर स्थानकातून रेल्वे सुटेल. ती नाशिक रोड स्थानकाला जोडली जाईल. 
►पहिल्या टप्प्यात या रेल्वेला सहा डबे असतील. त्यांची संख्या 12 आणि 16 पर्यंत वाढविता येईल. 
►या लोहमार्गावर 24 स्थानके आणि 18 बोगदेही असतील. 
►प्रकल्पाचा एकूण खर्च 16 हजार कोटी रुपये असेल 
►महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिल्यावर 1200 दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याचे महारेलचे नियोजन 

पुणे-नाशिक लोहमार्गासाठी गेली 25 वर्षे माझा पाठपुरावा सुरू होता. त्यातील मोठा टप्पा आता गाठण्यात यश आला आहे. राज्य सरकारकडील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी आता पाठपुरावा असेल. 
-शिवाजीराव आढळराव पाटील 
माजी खासदार, शिरूर 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in