महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री; एक राज्यभर फिरतात, दुसरे मातोश्रीवर असतात : चंद्रकांत पाटील 

राज्यात दोन मुख्यमंत्री असून एक मातोश्रीवरून राज्य चालवतायत आणि एक जण राज्यभर फिरुन राज्य चालवत आहे, अशी मिश्किल टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.
Maharashtra has two Chief Ministers; One travels across the state, the other is on Matoshri: Chandrakant Patil
Maharashtra has two Chief Ministers; One travels across the state, the other is on Matoshri: Chandrakant Patil


पुणे : राज्यात दोन मुख्यमंत्री असून एक मातोश्रीवरून राज्य चालवतायत आणि एक जण राज्यभर फिरुन राज्य चालवत आहे, अशी मिश्किल टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली. 

पुण्यात सरहद संस्थेच्या कार्यक्रमासाठी माजी मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुलाखत घेतली. ही मुलाखत म्हणजे निव्वळ मॅच फिक्सिंग आहे.

संजय राऊत यांना मुलाखत देण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी इतर चॅनेलला मुलाखत द्यायला हवी होती. अशा मुलाखतीमधून आपले सरकार पडणार नाही, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला जात आहे. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेवरून तीनही पक्षामध्ये नाराजी सुरू आहे. पण पदरात काही पडल्यानंतर आघाडीतील नेते गप्प बसतात. त्यामुळे राज्य सरकारचा कारभार कसा चालतो, हे दिसून येत आहे. 


पंकजा मुंडेंना लवकरच केंद्रात जबाबदारी 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शुभेच्छा देताना सांगितले की माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केंद्रात चांगली जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रात आम्ही नेतृत्वाशी बोलत आहेत. त्यांना लवकरच चांगली जबाबदारी देण्यात येईल. तशी केंद्रीय नेतृत्वाकडे आम्ही मागणी केली आहे. केंद्रीय नेतृत्वालाही सर्व माहीत आहे. त्यांचे सर्वांवर लक्ष आहे. 

भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून सकारात्मक विचार केला जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लवकरच केंद्रात चांगली जबाबदारी मिळेल, याचा चंद्रकांत पाटील यांनी पुनरुच्चार केला. ते पुढे म्हणाले की वाढदिवसाचे मी चॉकलेट आणले आहे. मात्र, त्यांना आता देऊ शकत नाही. ई. चॉकलेटपण देता येत नाही, असं सांगत त्यांना पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. 

Edited By Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com