महाराष्ट्राचा लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम; राज्यात पुणे अग्रेसर - Maharashtra Creates Record of Corona Vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्राचा लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम; राज्यात पुणे अग्रेसर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 एप्रिल 2021

महाराष्ट्राने लसीकरणात गुजरात (Gujrat), राजस्थान (Rajasthan), उत्तरप्रदेश (Uttar Prades) या राज्यांना मागे टाकले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांना लस देऊन महाराष्ट्राने पहिला क्रमांक राखला आहे.

पुणे :  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात (Corona Vaccine)महाराष्ट्रात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या नांवावर लसीकरणाच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (RajeshTope)यांनी प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. Maharashtra Creates Record of Corona Vaccination

महाराष्ट्राने लसीकरणात गुजरात (Gujrat), राजस्थान (Rajasthan), उत्तरप्रदेश (Uttar Prades) या राज्यांना मागे टाकले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांना लस देऊन महाराष्ट्राने पहिला क्रमांक राखला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र (Maharashtra) पहिल्यापासून अग्रस्थानी होता. राज्यात कोरोना भयानकरित्या वाढतो आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यंत्रणेची प्रभावी कामगिरी आणि नागरिकां नागरिकांचा प्रतिसाद यामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली.

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाली. त्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक केला होता. काल ३ एप्रिल रोजी राज्यभर ४१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली.  Maharashtra Creates Record of Corona Vaccination

काल पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई (Mumbai)उपनगर ४६ हजार ९३७, नागपूर ४१ हजार ५५६, ठाणे ३३ हजार ४९० या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख