गणपतराव देशमुखांनी आत्मचरित्र लिहावे : महादेव जानकर यांची विनंती

जानकर सध्या माण, खटाव,सांगोला,जत,आटपाडी,सांगोला या तालुक्याचा दौरा करत आहेत. याच दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी जेष्ठ नेते गणपतराव आबा देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली
Mahadev Jankar Gives Coutecy Visit to Ganpatrao Deshmukh
Mahadev Jankar Gives Coutecy Visit to Ganpatrao Deshmukh

पुणे : "लोकनेते गणपतराव देशमुख यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहावे. त्यांच्या आत्मचरित्रातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल."अशी अपेक्षा माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी माजी मंत्री, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव आबा देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आबांशी बोलताना त्यांना,"आबा,तुम्ही आत्मचरित्र लिहा."अशी विनंती केली आहे.

जानकर सध्या माण, खटाव,सांगोला,जत,आटपाडी,सांगोला या तालुक्याचा दौरा करत आहेत. याच दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी जेष्ठ नेते गणपतराव आबा देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी चर्चा करताना त्यांनी देशमुख यांना"तुम्ही आत्मचरित्र लिहा.त्यातून भावी पिढ्याना प्रेरणा मिळेल."असे सांगितले. 

यावेळी "आबांनीही आत्मचरित्र लिहायला होकार दिला दिला."असे जानकर यांनी सांगितले. "१९५२ पासून दोन पराभव वगळता गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघाचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षासोबत आपली बांधीलकी मानून काम केले.साधी राहणी ठेवत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.आबांचे जीवन हा एक आदर्शवाद आहे.त्यांनी आत्मचरित्र लिहिले तर भावी पिढ्याना त्यापासून प्रेरणा मिळेल."असे जानकर म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com