शिवाजी महाराजांच्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्या खर्गेंना प्रभारीपदावरून हटवा : कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

उदयनराजे यांनी दिलेल्या घोषणेलाकॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेप घेतल्याचे पुढे आले असून त्यावरून कॉंग्रेसमध्ये वाद पेटला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देण्यात आलेल्या घोषणेला आक्षेप घेणारे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घ्यावे.
Kharge, who objected to Shivaji Maharaj's announcement, should be removed from the post: Congress workers demand
Kharge, who objected to Shivaji Maharaj's announcement, should be removed from the post: Congress workers demand


पुणे : राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केलेली टिपण्णीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.

उदयनराजे यांनी दिलेल्या घोषणेला कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेप घेतल्याचे पुढे आले असून त्यावरून कॉंग्रेसमध्ये वाद पेटला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देण्यात आलेल्या घोषणेला आक्षेप घेणारे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घ्यावे, अशी मागणी पुणे शहरातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एका पत्राद्वारे पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. 

नवनिर्वाचित सदस्यांना बुधवारी (ता.२२ जुलै) राज्यसभेत बुधवारी खासदारपदाची शपथ दिली. भाजपकडून महाराष्ट्रातून निवडले गेलेले उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय शिवाजी, जय भवानी अशी घोषणा दिली होती. त्यावेळी खर्गे यांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्यामुळे नायडू यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेली घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केला असा आरोप करून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने नायडू यांना २० लाख पत्र पाठवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनीही तिरकस टिपण्णी केली होती. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यावरू उदयनराजे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अवमान झालेला नाही, असे स्पष्ट केले. तसेच, कॉंग्रेसचे खासदार आक्षेप का घेत आहेत, हे त्यांनाच विचारा, असे त्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कॉंग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पत्र पाठवून महाराजांच्या नावाला आक्षेप घेणारे खर्गे महाराष्ट्राचे प्रभारी कसे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्याच्या प्रभारीपदावरून त्यांना तातडीने काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या जनतेची अस्मिता आहे. महाराजांना महाराष्ट्रातच नव्हे तर, देशात मानले जाते. त्यांच्या नावावर कॉंग्रेसचे नेते आक्षेप कसा घेऊ शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

कॉंग्रेसचे शहर चिटणीस विनय ढेरे, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, हडपसरचे ब्लॉक उपाध्यक्ष देविदास लोणकर, पंडित नेहरू स्टेडियम ब्लॉकचे उपाध्यक्ष राकेश भिलारे, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय शिंदे आदींनी हे पत्र पाठविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना माननारा मोठा वर्ग कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी, आजी-माजी खासदार, आमदार आहेत. त्यांनाही खर्गे यांचे हा आक्षेप रूचलेला नाही. परंतु, दबावापोटी ते उघड बोलण्यास कचरत आहेत, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

खर्गे हे गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. त्यांनीही बुधवारी राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com