पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ जिंकू : जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास - Jayant Patil Confident about winning Graduate Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ जिंकू : जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

सागर आव्हाड
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदारसंघात उद्यापासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात होतीये, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत,सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित काम करतील राज्यातील पाच ठिकाणी महाविकास आघाडीचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विजयी होतील आम्ही ही निवडणूक जिंकू, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात उद्यापासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात होतीये, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत,सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित काम करतील राज्यातील पाच ठिकाणी महाविकास आघाडीचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विजयी होतील आम्ही ही निवडणूक जिंकू, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचाराचं नियोजन व करण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील , विश्वजित कदम आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  

''राज्यात महावितरण कंपनी तोट्यात आहे, तिला उभारी देण्याचं काम करावं लागणार आहे. एकीकडे वितरण कंपनीही तोट्यात आहे आणि सामान्य नागरिकांवरही बोजा आहे, मात्र महावितरण कंपनी फडणवीस सरकारच्या काळात तोट्यात गेली, आणि हा एवढा बोजा का वाढला ? याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वाढीव विजबिलाच्या संदर्भात कसा तोडगा काढायचा यावर चर्चा सुरू आहे, यातून लवकरचं मार्ग काढू, मात्र ६७ हजार कोटी रुपयांची थकबाकी ही फडणवीसांच्या काळातचं थकली," असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

''मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी की कशी हा काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, मात्र महाविकास आघाडीनं एकत्र येऊन मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे, देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, आपली मुंबईत किती ताकद आहे? त्यांचा पराभव निश्चित आहे. मात्र आतापासूनचं उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल, अशी उपरोधिक टिका पाटील यांनी फडणवीस यांना उद्देशून केली. 

''राज्यातल्या शाळा सुरू होत आहेत, मात्र मुंबईतली परिस्थिती आटोक्यात राहावी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असेल, मात्र राज्यात काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे, तिथले स्थानिक प्रशासन राज्य सरकारला कळवून निर्णय घेतील पालकांनी गोंधळून जाण्याचं कारण नाही आपण योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत,'' असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख