राज्यात कोरोनाच्या टेस्टिंगबरोबरच मृत्यूदरातही वाढ 

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक शहरांतील व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिनाभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूदरातही वाढ झाली आहे.
Increase in mortality along with corona testing in the state
Increase in mortality along with corona testing in the state

पुणे : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक शहरांतील व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिनाभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. 

गेल्या महिन्यात असलेला 3.81 मृत्यूदर या महिन्याच्या सुरवातीला 4.38 वर पोचला आहे. तपासण्यांची संख्या वाढल्याने मृत्यूदरात काहीशी वाढ झाल्याचे राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील आधिकारी सांगत आहेत. मात्र, तपासण्यात वाढ केल्याने या काळात अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे हे आधिकारी सांगत आहेत. 

गेल्या महिन्यात केंद्र सरकारचे पथक पुण्यात येऊन गेले. या पथकाने पुण्यात पाहणी केल्यानंतर काही सूचना केल्या आहेत. यामध्ये रॅपिड टेस्टिंग हा पर्याय सुचविला होता. मोठ्या प्रमाणात तपासण्या करून मृत्यूदर रोखणे, हाच एकमेव उपाय असल्याचे या पथकाने सुचविले होते. त्यानुसार पुण्यासह राज्यात तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. राज्यात सध्या 110 लॅबमध्ये कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये खासगी व सरकारी लॅबचा समावेश आहे. 

तपासण्या वाढवा, मृत्यूदर कमी होईल, असे सूत्र सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या महिनाभरात तपासण्या वाढविल्यानंतरही मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार झालेली वाढ केवळ 0.57 इतकी आहे. वाढविण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत वाढ फारशी झालेली नाही. उलट चाचण्यांची संख्या वाढविल्याने महिनाभरात आपण अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवू शकलो आहोत. चाचण्यांची संख्या वाढली नाही तर प्राथमिक अवस्थेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होते. अत्यवस्थ झाल्यानंतर तर रुग्ण रुग्णालयात दाखल झाला, तर मृत्यू होण्याची शक्‍यता असते. यातूनच मृत्यूदर वाढतो. 

येत्या काळात लॅबची संख्या वाढविण्याबरोबरच तपासण्यांची संख्या राज्यभरात आणखी वाढविण्यात येणार असल्याचे या यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. 

राज्याच्या इतर शहरांचा विचार केला तर तुलनेने पुणे व मुंबईत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यानंतर जळगाव व सोलापूर शहरात मृत्यूदर अधिक आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर पुण्यात व्यवहार सुरळित झाले. मात्र, शहराच्या जवळपास सर्वच भागात आता रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढली आहे. पुणे शहराच्या काही भागात आठ-आठ दिवस पूर्ण लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com