पुण्यातील लॉकडाउनचा निर्णय एकतर्फी नाही : अजित पवार

पुण्यातील लॉकडाउनचा निर्णय एकतर्फी घेतल्याची टीका खासदार गिरीष बापट यांनी केली होती. यावर अजित पवार यांनी व्यापक लोकहित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
guardian minister ajit pawar clarified about pune city corona lockdown
guardian minister ajit pawar clarified about pune city corona lockdown

बारामती : पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी एकतर्फी घेतला असून, एकाही आमदार, खासदाराला विश्वासात घेतले नाही, अशी नाराजी पुण्यातील भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केली होती. यावर अजित पवार यांनी खुलासा केला असून, पुण्याच्या लॉकडाउनसंदर्भात मी घेतलेला निर्णय हा एकतर्फी नाही तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचा विचार करुनच हा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे. 

खासदार गिरीष बापट म्हणाले होते की, लॅाकडाउनसारखा निर्णय घेताना कुठल्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतले गेले नाही. लॉकडाउनला सहकार्य करू, पण या निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे. अनेक लोकांना आता रोजगार नाहीत, सरकारने अजून पॅकेज जाहीर केलं नाही.लॉकडाउन हा सर्वातोपरी निर्णय नाही. कोरोना तपासणी केंद्रांची संख्या वाढविली पाहिजेत. केलय ते चांगले केले नाही, पण आमचं लॉकडाउनला सहकार्य असेल पण असे एकतर्फी निर्णय घेतले तर आम्ही विचार करू.

यावर अजित पवार यांनी म्हटले आहे की, लॉकडाउनचा निर्णय घेताना पुणे शहरातील सध्याची परिस्थिती, कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या, लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन न करणे, तसेच प्रशासनाकडूनही आलेल्या सूचना या गोष्टींचा व्यापक विचार केलेला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे, त्या मुळे त्यात एकतर्फी काही असायचे कारण नाही. 

कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची सरकारला आवश्यकता आहे. राज्य सरकार म्हणून आम्हीही सर्व बाजूंचाच विचार नेहमी करत असतो, मात्र हे करताना व्यापक जनहिताला प्राधान्य द्यावे लागते, प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात. मंत्रालयातील  वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिका-यांनाही याची कल्पना होती. दूरध्वनीवरुन जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले, त्यांनाही याची कल्पना दिली होती, त्यात पुण्याच्या महापौरांनाही याची माहिती दिली होती, असे पवार यांनी सांगितले. 

केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनसारख्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत, त्यामुळे त्याचाच अवलंब देशातही अनेक राज्ये करीत आहेत. आर्थिक स्तरावर अनेकांचे नुकसान होत आहे, याची जाणीव आहे, मात्र तरीही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी नमूद केले.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com