Filed a case against former MP Sanjay Kakade | Sarkarnama

माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

माजी खासदार आणि उद्योजक संजय काकडे यांनी सख्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : माजी खासदार आणि उद्योजक संजय काकडे यांनी सख्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

युवराज ढमाले (वय 40, रा. धनकवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार संजय काकडे (वय 52), पत्नी उषा काकडे (वय 44, दोघेही रा. यशवंत घाडगे नगर, रेंजहिल्स, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. काकडे आणि ढमाले यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय सुरु होता. मात्र, ढमाले यांनी 2010 पासून स्वतंत्र व्यावसाय सुरु केला होतो. त्यावरुन काकडे व फिर्यादी ढमाले यांच्यामध्ये मतभेद झाले होते. 

दरम्यान, फिर्यादी ढमाले हे ऑगस्ट 2018 मध्ये काकडे यांच्या घरी गेले, तेव्हा काकडे यांनी त्यांना "तुला संपवायला वेळ लागणार नाही,' अशा शब्दांत धमकी दिली होती. त्यानंतर काकडे यांनी "मी सत्तेत आहे, पाहिजे ते करू शकतो. नीट राहा. माझे अनेक गुंडांशी संबंध असून, नीट राहा,' असे सांगत त्यांचे मेव्हणे ढमाले यांना धमकावले होते. त्यानंतर पुढच्याच महिन्यात काकडे यांनी ढमाले यांना "तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस. तुला व तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन कधी संपवेल, माझे नाव ही कुठे येणार नाही. तुला गोळ्या घालून आजच संपवेल,' अशा शब्दांत जिवे मारण्याची धमकी दिली होती, असे ढमाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख