फडणवीस म्हणतात, 'राज्यात अजूनही आपला दबदबा' 

माझे वजन आजही कायम आहे, ते खरोखरीच जास्त असल्याचे मिश्‍किलपणे सांगत, कोरोनापासून पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीपुण्यात सांगितले.
Fadnavis says, We still dominant in the state
Fadnavis says, We still dominant in the state

पुणे : "माझे वजन आजही कायम आहे, ते खरोखरीच जास्त असल्याचे मिश्‍किलपणे सांगत, कोरोनापासून पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 23 जून) पुण्यात सांगितले. राज्यात आपला अजूनही दबदबा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री माझे ऐकतील,' असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 23) पुण्यातील आपल्या दौऱ्यात स्थानिक आरोग्य यंत्रणेची पाहणी करीत आढावा घेतला. त्यातील काही निरीक्षणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुळात, गेल्या अडीच महिन्यांपासून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हाल झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे पुण्यात लक्ष घालायला इतका उशीर का? अशी विचारणा केली असता, फडणवीस यांनी आपल्या वजनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आताही प्रश्‍न उपस्थित केला तरी त्याची दखल घेतली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

फडणवीस म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका काम करीत आहेत. त्यांना राज्य सरकारनेही आर्थिक मदत करायला हवी. मात्र तसे होताना दिसत नाही. या सरकारचे पुणे शहराकडे दुर्लक्ष आहे. कोरोनाच्या चाचण्यांचा वेग हा दुप्पट झाला पाहिजे. त्यामुळेच कोरोनाला रोखणे शक्‍य होणार आहे. या बाबी महापौरांपासून इतरांनी सरकारला कळविल्या आहेत; मात्र त्यांचे कोणी ऐकले नाही. माझे वजन आहे; त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे निश्‍चितपणे माझे ऐकतील.'' 

कोरोनाच्या काळात सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. ही राजकारणाची वेळ नाही. सत्तेत येण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. काहीसा वेळ लागेल. मात्र, आम्ही सत्तेत नक्की येऊ, त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता कोरोनाशी लढताना सरकारला आवश्‍यक ते सहकार्य करण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. 

कोरोनाशी लढताना समन्वय महत्वाचा आहे. मुख्यत: खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट होत आहे. अशाप्रकारे संकटात सापडलेल्या रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयावर प्रशासनाने लक्ष ठेऊन कारवाई करण्याची गरज आहे. अशाप्रकारे रुग्णांची लूट करणाऱ्या काही रूग्णालयांवर कारवाई झाली तर इतरांना त्याचा धाक बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याबरोबरच राज्याचाही दौरा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com