राज्याकडे पैसे नसल्याची नाटकं बंद करा..... - Devendra Fadanvis Hits on State Government over Centers Help | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

राज्याकडे पैसे नसल्याची नाटकं बंद करा.....

सागर आव्हाड
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर नव्वद नव्वद कोटी रुपये खर्च करायला पैसै आहेत, दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसै आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे पैसै नाहीत ही नाटकं बंद करावीत, अशी सणसणीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे : राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे निवेदन गेल्यानंतरच केंद्रीय पथक येते. राज्य सरकारने निवेदनच उशीरा पाठवले. मात्र केंद्रीय पथक योग्य तोच अहवाल देईल असे वाटते. राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर नव्वद नव्वद कोटी रुपये खर्च करायला पैसै आहेत, दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसै आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे पैसै नाहीत ही नाटकं बंद करावीत, अशी सणसणीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुण्यात मांजरी येथे बोलताना त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. केंद्राच्या कृषी कायद्याचेही त्यांनी समर्थन केले.  ते म्हणाले, " शेतकऱ्याला त्याचा मालाचा आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहे. काही लोकं कृषी कायद्यासंदर्भात दुट्टपी भूमिका घेत आहे. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे. हे या कायद्यात आहे. तसेच शेतकऱ्यांना संरक्षण देणारे हे कायदे आहेत. शिवाय कृषी कायद्यासंदर्भात स्वतः मोदी देशासमोर विवेचन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ९ कोटी शेतकऱ्यांना खात्यावर पैसे ट्रान्स्फर करणार आहेत,''

ते पुढे म्हणाले, ''राज्यातील सरकारने पीक विमा योजना बासनात गुंडाळून ठेवली. 
केळीच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विम्याचे निकष या सरकारने बदलल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याना आता मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचा आता विचार केला जात नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकर्‍यांच्या बांधावर गेले होते. तेव्हा ५० हजारी हेक्टरी देऊ असे म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र ८ हजार रुपयेच दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की बागायत शेतकर्‍यांना दीड लाख रुपये देऊ. राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला. प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्याचे काम या सरकारने केले आहे. मोदी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि कायम राहतील,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख