Court remands woman in defamation case against Ajit Pawar
Court remands woman in defamation case against Ajit Pawar

अजित पवारांची बदनामी करणाऱ्या महिलेस न्यायालयीन कोठडी

सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगीता वानखेडे यांना शिरूरच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिक्रापूर (जि. पुणे)  : सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगीता वानखेडे यांना शिरूरच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, त्यांची रवानगी बुलडाणा जिल्ह्यातील तुरुंगात करण्यात आली आहे. शिक्रापूरचे पोलिस पथक नुकतेच त्यांना घेऊन बुलडाण्याकडे रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. 

दरम्यान, संगीता वानखेडे यांनी आपला मोबाईल हरवला असल्याचे तपासाच्या दरम्यान पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक शेलार यांनी दिली आहे. 

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ९ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर संगीता वानखेडे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड (रा. कोंढापूरी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या तक्रारीनुसार १८ जुलै रोजी चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील संगीता वानखेडे यांच्याविरुध्द बदनामी, शिवीगाळ, असभ्य भाषा व आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

याच दरम्यान, वानखेडे यांच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे बुलडाणा जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यांना बुलडाणा पोलिसांनी आधीच अटक केली होती. शिक्रापूर पोलिसांनी वानखेडे यांना बुलडाण्याहून दोन दिवसांपूर्वी तपासासाठी शिक्रापूरला आणले होते. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी शिरुर न्यायालयाने त्यांना आजपर्यंत (ता.२३ जुलै) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली. 

सोशल मीडियावरुन केलेल्या बदनामी प्रकरणी संगीता वानखेडे यांचा तपास करताना पोलिसांना त्यांचा मोबाईल हवा होता. फेसबुक, व्हॉट्स अप आणि इतर माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी संगीता वानखेडे यांच्याकडे तपास करत असताना मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आपला मोबाईल हरवल्याचे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले, अशी माहिती पोलिस निरीक्षक शेलार यांनी दिली आहे. 

दरम्यान मोबाईलचा डम्पडाटा, कॉल डिटेल्स, डिलिटेड आणि अपलोडेड डाटा हा मिळविणे पोलिसांसाठी अवघड नाही. मात्र, वानखेडे यांचा मोबाईल हरविल्याने आता पोलिसांना वरील सर्व सोपस्कर पुन्हा न्यायालयाच्या परवानगीने करावे लागणार आहेत. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com