"सारथी", "महाज्योती", "बार्टी"साठी दीडशे कोटींची तरतूद.. 

राज्यातील आठ प्राचीन मंदीराच्या विकासासाठी 101 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
sarti8.jpg
sarti8.jpg

मुंबई : "सारथी", "महाज्योती" व बार्टी या संस्थांच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील आठ प्राचीन मंदीराच्या विकासासाठी 101 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत व कोविड योद्ध्यांना अभिवादन करत अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचा महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. 

साखरउद्योगास चालऩा देण्यासाठी पुण्यातील साखर संकुल परिसरात 40 कोटी रूपये खर्च करून साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. साखर उद्योगाविषयी सर्व महत्वाचे घटक एकाच छत्राखाली आणत साखर संग्रहालय हे संग्रहालय उभाण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. 

परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देण्यात येणार आहे. जेजुरीगडासाठी, सांगलीतले बिरुदेव देवस्थानच्या विकास आराखड्यास निधी देण्यात येणार आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन देणार आहे. 

संत नामदेव महाराजांच्या नरसी नामदेवच्या विकासाला पुरेसा निधी, बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. पोहरादेवीच्या विकासाच्या कामास हवा तेवढा निधी देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील आश्रम शाळेची नियमित शाळांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी पहिल्या टप्पात शंभर आश्रमशाळेचा यात समावेश करण्यात येणार आहे.  

  1. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड व साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार
  2. अमरावती, परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार
  3.  बी.जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देणार
  4. एसटीला १४०० कोटींची मदत 
  5. सोलापूरमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ 
  6. पुणे - नाशिक रेल्वे मार्गाला मंजूरी
  7.  वेऱूळच्या विमानतळाचा विस्तार करणार-औंध येथे संसर्गजन्य विकार रुग्णालय सुरु करणार
  8. २४ तासांत अँजिओग्राफी होण्यासाठी ८ ठिकाणी कार्डिअॅक सेंटर सुरु करणार
  9. शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे बसविणार
  10.  ११ शासकीय परिचारिका विद्यालयांचे महाविद्यालयांत रुपांतर करणार
  11. समृद्धी महामार्ग 700 किमी पैकी 500 किमी मार्ग पूर्ण झाला आहे
  12. 170 किमी लांबीचा रिंग रोड पुण्यात करणार
  13. ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे
  14. एसटीच्या आधुनिकीकरण करण्यसाठी 2 हजार कोटी रुपये 
  15. दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगर याना जोडणारा फ्री वेला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच नाव
  16. मुंबईत वरळी ते शिवडी या उड्डाणपूल काम सुरू झालं आहे
  17. ठाणे खाडीला लागून ठाणे कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे.
  18. पूर्व द्रुतगती मार्गावर सायकल ट्रॅक उभारला जाणार आहे
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com