हर्षवर्धन पाटलांना धक्का :  भावाने केला राष्ट्रवादीत प्रवेश

त्या चर्चेस आज पूर्णविराम मिळाला.
BJP leader Harshvardhan Patil's brother Prashant Patil joins NCP
BJP leader Harshvardhan Patil's brother Prashant Patil joins NCP

इंदापूर (जि. पुणे)  ः इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, युवा नेते संग्रामसिंह पाटील यांनी आज (ता. १६ जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत  पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील हे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू असून त्यांच्या प्रवेशामुळे बावड्याच्या पाटील घराण्याची राजकीयत टबंदी ढासळण्यास सुरुवात झाली आहे. (BJP leader Harshvardhan Patil's brother Prashant Patil joins NCP)

प्रशांत पाटील यांची भारतीय जनता पक्षामध्ये घुसमट होत होती, त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्या चर्चेस आज पूर्णविराम मिळाला. 

प्रशांत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे बावडा गाव, बावडा-लाखेवाडी जिल्हापरिषद मतदार संघ तसेच तालुक्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केले असून ते अभ्यासू वक्ते म्हणून परिचित आहेत. 

प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, सचिन सपकळ, रणजित घोगरे उपस्थित होते. 

या वेळी प्रशांत पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याची जडण-घडण काँग्रेस पक्षाच्या विचारातून झाल्यामुळे आमची भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड घुसमट होत होती. माझ प्रवेश म्हणजे ट्रेलर आहे, पिक्चर अबी बाकी है. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार, तर राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. 

प्रदीप गारटकर म्हणाले, प्रशांत पाटील हे अभ्यासू राजकारणी असून त्याचा फायदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित होणार आहे. त्यामुळे इंदापूर तालुका राष्ट्रवादीमय होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com