बाळासाहेब ठाकरे आज इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी उभे राहिले असते 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होतो आहे, याचे वाईट वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी इंदोरीकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची भूमिका घेतली असती.
Balasaheb Thackeray would have stood behind Indorikar Maharaj today
Balasaheb Thackeray would have stood behind Indorikar Maharaj today

पुणे : "उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होतो आहे, याचे वाईट वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी इंदोरीकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याची भूमिका घेतली असती,' अशा शब्दांत आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. 

"या राज्यात हिंदू धर्मातील प्रबोधनकाराला त्रास होतो. तरीही ठाकरे सरकार गप्प बसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर ही वेळ आली नसती,' असे मत मेटे यांनी व्यक्त केले. 

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर कीर्तनातील एका वाक्‍यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे."आम्ही इंदोरीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,' असेही त्यांनी म्हटले आहे. 

"हे सरकार हिंदुत्ववादी विचारांच्या साधू, संतांना त्रास देण्याचे काम करत आहे. इंदोरीकर यांच्यासारखे लोक समाजात प्रबोधन करत आहेत. मात्र, त्यांच्यावर प्रसिद्धीला हपापलेल्या लोकांना टीका करायला कोणीतरी भाग पाडत आहे. अशा लोकांचे ऐकून सरकार इंदोरीकर यांना त्रास देत आहे,' असा आरोप मेटे यांनी केला. 

"निवृत्ती महाराज इंदोरीकर गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रबोधन करत आहेत. आजवर त्यांच्याबद्दल कोणाची काही तक्रार नाही. मग आताच त्यांच्याबद्दल तक्रारी का होत आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. कोणाच्या सांगण्यावरून इंदोरीकर यांना टार्गेट केले जात आहे?' असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला आहे. 

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर ते इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते. आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान असतानाही इंदोरीकर यांच्यासारख्या प्रबोधनकारावर गुन्हा दाखल होतो आहे. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना व्यसनमुक्त करणाऱ्या इंदोरीकर यांच्यावर अशी वेळ येते, याचे वाईट वाटते,' असे मेटे म्हणाले. 
 

किर्तनकार इंदोरीकरांच्या विरोधातील केस मजबूत; शिक्षा होऊ शकते : सरकारी वकील

शिर्डी : प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानाबाबत आज संगमनेर न्यायालयात पहिली सुनावणी झाली. यानुसार त्यांना आता पुढील तारीख सात आॅगस्ट देण्यात आली आहे.  होणार आहे. या वेळी त्यांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना या वेळी वकिलामार्फत जामीन घ्यावा लागेल.

पूत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज संगमनेर सत्र न्यायालयात याबाबतची पहिली सुनावणी झाली. सरकारतर्फे अॅड. लीना चव्हाण यांनी बाजू मांडली. इंदोरीकरांनी अद्याप आपला वकील दिलेला नाही. आज केवळ समन्स बजाविण्याचे काम न्यायालयात झाले. 

या कार्यवाहीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाल्या की अतिशय बळकट असा हा खटला आहे. इंदोरीकर महाराजांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे विधान सोशल मिडियातून संपूर्ण राज्याने ऐकले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते. न्यायालयाचा हा निर्णय अमान्य असल्यास त्यांना वरच्या न्यायालयात जाऊन खटला थांबविण्यासाठी अर्ज करावा लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com