BREAKING हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पुण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा - Attempt of Murder Offence Registered against Harshwardhan Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

BREAKING हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पुण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

सागर आव्हाड
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पुण्यात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एक किरकोळ अपघात प्रकरणावरुन झालेल्या भांडणात एका दांपत्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात पुण्यात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एक किरकोळ अपघात प्रकरणावरुन झालेल्या भांडणात एका दांपत्याला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आला आहे. 

अमन चड्डा या तरुणाने हर्षवर्धन जाधव व त्यांच्या सोबत असलेल्या इषा झा यांच्याविरोधात ही तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार फिर्यादी चड्डा यांचे आई-वडील दुचाकीवरुन औंध परिसरात जात असताना जाधव यांनी आपल्या चालत्या गाडीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे चड्डा यांच्या आईवडिलांना त्याचा धक्का लागला. चड्डा दांपत्याने जाधव यांना याचा जाब विचारल्यावर भांडण झाले. त्यावेळी आपली हृदयशस्त्रक्रीया झाली असल्याचे सांगून देखील जाधव व झा यांनी आपल्या आईवडिलांना मारहाण केली व खुनाचा प्रयत्न केला, अशी चक्रार अमन चड्डा यांनी दिली आहे. 

चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख