Anil Deshmukh Responded to Tweet by Youth | Sarkarnama

तरुणाच्या हाकेला अनिल देशमुखांनी दिला प्रतिसाद

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

का तरुणाला आपल्या बहिणीच्या विवाहासाठी बाहेरगावी जाण्याची परवानगी देण्यासाठी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. या तरुणाच्या ट्वीटला प्रतिसाद देत अनिल देशमुखांनी नगर पोलिसांना त्याच्या ट्रॅव्हल पासच्या बाबत लक्ष घालण्याच्या सुचना केल्या आहेत. 

पुणे : एका तरुणाला आपल्या बहिणीच्या विवाहासाठी बाहेरगावी जाण्याची परवानगी देण्यासाठी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. या तरुणाच्या ट्वीटला प्रतिसाद देत अनिल देशमुखांनी नगर पोलिसांना त्याच्या ट्रॅव्हल पासच्या बाबत लक्ष घालण्याच्या सुचना केल्या आहेत. 

'माझ्या बहिणीचे लग्न २ जुलैला असून त्यासाठी नगर पोलिसांना ट्रॅव्हल पास देण्याची विनंती अद्याप मान्य झालेली नाही, गेल्या दोन दिवसांपासून आपला अर्ज विचाराधीन आहे. कृपया मला मदत करा,' अशी विनंती नगरच्या सार्थक प्रशांत बोरा या तरुणाने गृहमंत्र्यांना ट्वीटरवरुन विनंती केली. त्याला गृहमंत्र्यांनी तातडीने प्रतिसाद दिला. या प्रकरणात लक्ष घालावे, अशी सूचना देशमुखांनी नगर पोलिसांना केली. 

शासनाच्या निर्देशांचे पालन करुन आपण लग्न पार पाडाल, अशी आशा बाळगतो. तुमच्या बहिणीला उज्ज्वल भविष्यासाठी व कुटुंबाला विवाह सोहळ्यासाठी शुभेच्छा! असे म्हणत गृहमंत्र्यांनी आपल्या सद्भावनाही व्यक्त केल्या. 

पुण्याच्या एका तरुणानेही शेतीच्या कामासाठी ट्रॅव्हल पास मिळण्यासाठी विनंती केली होती. ट्वीटरवर केलेल्या या विनंतीलाही देशमुख यांनी प्रतिसाद देत पुणे पोलिसांना याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख