आमदार अनिल भोसले यांचा जामीन पुन्हा एकदा फेटाळला

दोषारोपपत्रांनतरचाही जामीन न्यायालयाने नाकारल्याने भोसले यांना आता आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. या गैरव्यवहार प्रकरणात योगेश लकडे (वय ३९, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीराव भोसले बॅंक गैरव्यवहार प्रकरणी एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Anil Bhosale's Bail Plea Rejected for Second time
Anil Bhosale's Bail Plea Rejected for Second time

पुणे  : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज आज दुस-यांदा फेटाळण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा जामीन फेटाळला. 

दोषारोपपत्रांनतरचाही जामीन न्यायालयाने नाकारल्याने भोसले यांना आता आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. या गैरव्यवहार प्रकरणात योगेश लकडे (वय ३९, रा. आंबेगाव) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीराव भोसले बॅंक गैरव्यवहार प्रकरणी एकूण १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. भोसले यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा नाही. आम्ही दहा कोटी रुपये भरण्यात तयार आहोत; तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल आहे, त्यामुळे जामीन मंजूर कण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. 

आरोपींच्या विरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावा आहे. केवळ दहा कोटी रुपये भरून काहीच साध्य होणार नाही. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत फुगवण्यात आली आहे. तसेच पुराव्यात हस्तक्षेप होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भोसलेय यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी फिर्यादीचे वकिल अॅड. सागर कोठारी यांनी न्यायालयाला केली. केली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी बाजू मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com