सोशल मीडियातून अजित पवारांची बदनामी; महिलेवर गुन्हा  - Ajit Pawar's notoriety through social media; Crime on woman | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

सोशल मीडियातून अजित पवारांची बदनामी; महिलेवर गुन्हा 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 18 जुलै 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्याबद्दल सोशल मीडियात आक्षेपार्ह टिपणी व बदनामी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांकडे स्वप्निल गायकवाड (कोंढापुरी, ता. शिरूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील एका महिलेवर बदनामी, शिवीगाळ, असभ्य भाषा व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिक्रापूर (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्याबद्दल सोशल मीडियात आक्षेपार्ह टिपणी व बदनामी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांकडे स्वप्निल गायकवाड (कोंढापुरी, ता. शिरूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील एका महिलेवर बदनामी, शिवीगाळ, असभ्य भाषा व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, संबंधित महिलेवर अशाच प्रकारचा गुन्हा बुलडाणा (जि. बुलडाणा) पोलिसांकडे दाखल आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास बुलडाणा पोलिसांबरोबरच आम्हीही करणार आहोत, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. 

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नऊ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर संगीता वानखेडे नावाच्या महिलेकडून एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यात अजित पवार खात्यावरुन दादांबद्दल असभ्य भाषेत बदनामकारक वक्तव्य करण्यात आले. याबाबत कोंढापुरीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते स्वप्निल अरुण गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार पवार यांच्याबद्द्ल असभ्य वक्तव्ये केली. यावरून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, संशयित आरोपी वानखेडे या महिलेवर अशाच प्रकारचा गुन्हा बुलडाणा (जि. बुलडाणा) येथेही दाखल झालेला आहे. त्यानुसार त्या महिलेला बुलडाणा पोलिसांनी अटकही केली आहे. त्याप्रकरणीच शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोन्ही तपास एकत्रित करण्याची प्रक्रीया चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार तपास करीत आहेत. 

सचिन सावंतांनी एकदा डोके तपासून घ्यावे : गिरीश महाजन 

जळगाव : ‘‘कॉंग्रेस पक्षातर्फे सचिन सावंत यांना एमएलसी हवी होती, ती न मिळाल्यामुळेच त्यांना फस्ट्रेशन आले आहे. त्यामुळेच ते अशी वक्तव्य करीत आहेत. त्यांचे डोके एकदा तपाण्याची गरज आहे,’’ अशी टीका राज्याचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. 

राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी बिल्डर व व्यवसायिकाकडून ५०० कोटी रुपये जमविल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. त्यावर माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की, ज्यांना स्वत:चे घर, स्वत:ची माणसे सांभाळता येत नाहीत, ते एवढे मोठे विधान करतात. त्यांचे हे आरोप अत्यंत बेछूट आणि चुकीचे, निराधार आहेत. सावंत यांना कॉंग्रेसकडून एमएलसी मिळणार होती, पक्षाने ती न दिल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच ते आता अशी विधान करीत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख