आढळराव यांनी केले महेश लांडगे यांचे कौतुक 

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हाकेला भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ओ देत तत्काळ मदत केली.
 Adhalrao praised Mahesh Landge
Adhalrao praised Mahesh Landge

पुणे ः कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सोडत नाहीत. मात्र, राजकारण राजकारणापाशी असते आणि वैयक्तिक जिव्हाळा, ऋणानुबंध राजकारणापलीकडचे असतात. अशीच एक घटना भोसरी येथे घडली आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हाकेला भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ओ देत तत्काळ मदत केली. 

शिवसेनेचे माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, दिघी परिसरातील हातगाडीवाले, पथारीवाले, मोलमजूर यांची अनेक कुटुंबे आर्थिक संकटात असल्याची माहिती स्थानिकांकडून समजली. याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशी मी दूरध्वनीवरून संपर्क साधला. माझ्या सांगण्यावरून येथील 78 कुटुंबांना तत्काळ जीवनावश्‍यक वस्तू आणि किराणा साहित्य पोच करण्याची व्यवस्था करण्यात आली, त्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

सन 2019 ची लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. या पराभवात त्यांच्या हक्काच्या जुन्नर, खेड, आंबेगाव मतदारसंघातून अपेक्षित मतदान झाले नाही. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सुमारे 48 हजार मतांचे भरभरून दान केले होते. या निवडणुकीत लांडगे यांनी प्रामाणिक काम केल्याचे प्रमाणपत्रदेखील आढळराव यांनी दिले होते. दोन्ही दादांचा जिव्हाळा आणि ऋणानुबंध कायम असून, शिवाजीदादांच्या हाकेला महेशदादांनी दिलेला "ओ' हे ऋणानुबंधही पुन्हा अधोरेखित झाले आहेत. 


तुषार भोसले म्हणतात, "पृथ्वीराज चव्हाणांवरील टिकेमुळे कॉंग्रेस समर्थकांकडून मला धोका'' 

नाशिक : देवस्थानचे सोने ताब्यात घेण्याच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर वादग्रस्त टिका आणि वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर चर्चेत आलेले तुषार भोसले यांनी नाशिक सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे. माझी भूमिका कॉंग्रेसच्या काही व्यक्तींच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला धोका आहे. आपला भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे छायाचित्र व्हायरल करून माझी बदनामी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

चव्हाण यांनी "देवस्थानांचे सोने ताबडतोब ताब्यात घ्या', असे गेल्या 13 मे रोजी म्हटले होते. त्यावर स्वतःला आचार्य भोसले म्हणविणारे तुषार भोसले यांनी टीका केली होती. या मताला विरोध केला होता. ""चव्हाण यांच्या मागणीचा निषेध जिव्हारी लागल्याने कॉंग्रेसचे काही नेते वा समर्थकांनी माझे नाव आणि जातीवरून बदनामी चालविली असल्याचा आरोप भोसले यांचा आहे. त्यांच्या तक्रारीनुसार माझे नाव तुषार शालिग्राम भोसले असूनही सोशल मीडियावर माझे खरे नाव आचार्य तुषार भोसले नसून, तुषार शालिग्राम पितांबर असे आहे व हा बहुजन नसून ब्राह्मण आहे, असा अपप्रचार करीत माझ्या मराठा समाजाचा तसेच ब्राह्मण अशा "मराठा' आणि 'ब्राह्मण' या जातींचा उल्लेख करून दोन्हीही समाजाचा अवमान करून दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत,'' असे भोसले यांनी म्हटले आहे. 

""फेसबुकवर विविध नावांच्या अकाउंटवरून माझ्याविषयी अपप्रचार सुरू आहे. तसेच माझ्याविरोधात तक्रार दाखल करून "तो' गुन्हा नोंदवल्याची खोटी माहिती आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल करून माझी बदनामी सुरू आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक समर्थक, कार्यकर्ते सोशल मीडियामध्ये माझा बदला घेण्याची भाषा करीत असल्याने माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो,'' असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com