सातारा जिल्हा बॅंकेत मिळणार सातबारा 

शेतकऱ्यांना7/12 व 8 अचे उतारे मिळण्याची सुविधा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्व शाखांमधून उपलब्ध होणार आहे.
7/12 will be available at Satara District Bank
7/12 will be available at Satara District Bank

सातारा : शेतकऱ्यांना विना विलंब 7/12 आणि 8 अ' चे उतारे ऑनलाइन मिळण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. बॅंकेच्या या प्रयत्नांस यश आले असून सरकारने वेब पोर्टलद्वारे शेतकरी सभासदांना कर्ज प्रकरणाकरिता 7/12 व 8 अ उतारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर राज्यातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार बॅंकेने सरकारसोबत सामंजस्य करार देखील केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या धारण क्षेत्राच्या 7/12 व 8 अ' चे उतारे मिळण्याची सुविधा बॅंकेच्या सर्व शाखांमधून उपलब्ध होणार आहे. 

प्रारंभी ही सुविधा बॅंकेच्या विभागीय कार्यालयातून सुरू केली असून लवकरच बॅंकेच्या सर्व शाखांमधून ही सुविधा दिली जाणार आहे. या सुविधेचा प्रारंभ बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 

शेतकरी सभासदांना तात्काळ 7/12 व 8 अ उतारे उपलब्ध होणार असून त्यांना कर्ज पुरवठाही विना विलंब होणार आहे. कर्ज प्रकरणासाठी कर्जदार सभासदांना 7/12 व 8 अ उतारे याच्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत अथवा ताटकळत बसावे लागणार नाही. त्यामुळे या नावीन्यपूर्ण सुविधेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आमदार भोसले यांनी केले आहे. 

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की सातारा जिल्हा सहकारी बॅंकेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारच्या "वेब पोर्टल'द्वारे शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन 7/12 त्वरीत मिळण्याची सुविधा सातारा जिल्हा बॅंकेत उपलब्ध झाली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

या वेळी सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, तसेच बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com