शरद पवार राजकीय नेत्यांचे आदर्श : चंद्रकांत पाटील - Sarad Pawar is the role model of political leader bjp leader chandrakant patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शरद पवार राजकीय नेत्यांचे आदर्श : चंद्रकांत पाटील

सुनील पाटील
शनिवार, 12 डिसेंबर 2020

शरद पवार यांच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी आशा आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. यानिमित्ताने विविध क्षेत्रातून पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल ५० वर्ष पूर्ण करून अनेक राजकीय नेत्यांसाठी आदर्श असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. त्यांच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी आशा आहे. पवार यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो.. अशा शुभेच्छा." 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राजकारणात सदैव मतभेद पाहायला मिळतील, मात्र मनभेद कधीच नाही. असेच भिन्न विचारसरणीचे मात्र अनेक राजकारण्यांचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस.  राजकारणात तब्बल 50 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीन वेळा पदभार सांभाळला आहे.

राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांचा विशेष उल्लेखनीय निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देऊन त्यांना शासन निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणं. भारताचे कृषी मंत्री असताना त्यांनी शेती आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रात वाखाणण्याजोगे प्रयोग केले. शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन जीवनात पुढे जाऊ शकतात, अशा सर्व विधेयकांना पवार यांच्याकडून समर्थन मिळाले आहे आणि पुढेही मिळेल.

कोरोना काळातही आपल्या वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील, असे दौरे त्यांनी केले. राजकारणात आपले विचार आणि आपले आदर्श हे वेगळे राहतील परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर देखील नेहमीच मार्गदर्शन करत रहाल अशी मी आई अंबाबाईकडे प्रार्थना करतो."  

उद्योगमंत्री पवारांच्या 90 किलोच्या वजनानं 60 किलोचे उद्योजक विव्हळतात तेव्हा...
पुणे : गोष्ट त्रेचाळीस वर्षांपूर्वीची. तेव्हा शरद पवार राज्यात उद्योगमंत्री होते. पवार यांनी जवळच्या सर्व मित्रांना मुंबईत मुक्कामाला बोलावले. रात्रभर जेवण आणि गप्पा झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले. नेहमीच्या सवयीने पवार यांनी सकाळी लवकर कामाला सुरवात केली. मात्र, त्यांचे मित्र असलेले विठ्ठलशेठ मणियार अंग दुखण्याचे कारण सांगत झोपेतून उठण्यास नकार दिला. त्यांची तक्रार घेऊन श्रीनिवास पाटील बंगल्याच्या कार्यालयात काम करीत असलेल्या पवार यांच्याकडे गेले. पवार तातडीने परत आले. अंग दुखत असलेल्या मणियार यांना उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, मणियार उठत नसल्याचे पाहून पवार यांनी त्यांच्या अंगावर उभे राहून अंग चेपून देण्यास सुरवात केली. पवार यांच्या 90 किलोच्या ओझ्याने 60 किलो वजन असलेले मणियार अक्षरश: विव्हळत उठले. उद्योगमंत्री या नात्याने उद्योजकाची सेवा करीत असल्याची मिश्‍किल टिपणी पवार यांनी केल्याची आठवण मणियार यांनी सांगितली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख