पिंपरी : एका महिला पोलिसाने आपल्या प्रियकराचेच अपहरण करून त्याच्याकडून दहा लाख रुपये खंडणी व ती न दिल्यास किडनी देण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. याप्रकरणी शहरातील या वाहतूक महिला पोलिसासह पुणे पोलिस मुख्यालयातील आणखी एक पोलिस व इतर पाच अशा सातजणांविरुद्ध खंडणी व अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा आज शहरातील वाकड पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
रजेवर असताना या महिला पोलिसाने हा प्रताप केला आहे. पाच तारखेला ही घटना घडली. एखाद्या गुन्ह्यात पोलिसही असला, तरी त्याला सोडू नका, कारवाई करा असा आदेश तडफदार व प्रामाणिक पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा असल्याने हा गुन्हा दाखल केल्याचे सहाय्यक पोलिस आय़ुक्त (वाकड विभाग) गणेश बिरादार यांनी सरकारनामाला सांगितले.
पवारांच्या नांवाची चर्चा म्हणजेच काँग्रेस संपवण्याचा डाव.. https://t.co/I8iQNm8VSR
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 11, 2020
आरोपी पोलिसांच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती त्यांनी दिली. मनिषा साळवे असे या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. ती चिंचवड वाहतूक विभागात कामाला आहे. तर, या गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी पोलिस विजयकुमार साळवे हा पुणे पोलिस मुख्यालयात शिवाजीनगर येथे कार्यरत आहे. मनिषा हिची आई आणि आक्की लोंढे, विनय लोंढे, सनी लोंढे हे या गुन्ह्यात इतर आरोपी असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मनिषा व या गुन्ह्यातील फिर्यादी तरुण सुरज चौधरी (वय २१, रा. त्रिवेणीनगर, निगडी) याच्याशी ओळख होती. सूरजकडून मनिषाने एक लाख रुपये उसने घेतले होते. ते देण्यासाठी त्याला थेरगाव येथे ५ तारखेला तिने बोलावले. मात्र, पैसे न देता त्याला मोटारीत घालून इंदापूर (जि. पुणे) येथील जंगलात नेले. तेथे त्याला लाकडी दांडका आणि कोयत्याने मारहाण केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मोबाईल फोडला आणि वर त्याच्याकडूनच दहा लाख रुपयांची मागणी केली. ते दिले नाही,तर तुझी किडनी दे असे सुद्धा त्याला तिने धमकावले.
हेही वाचा : युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दानवेंच्या घरावर धडकले भोकरदन : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानाचा हात असल्याचे धक्कादायक विधान दोन दिवसांपुर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. देशभरातून या वक्तव्याचा निषेध होत असतांना आज युवक काँग्रेसच्या वतीने भोकरदन येथील दानवे यांच्या निवासस्थानासमोर जवाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दानवे व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे

