पिंपरी चिंचवड पालिकेत आगामी विरोधी पक्षनेता कोण? राष्ट्रवादी कडून पाच जण इच्छुक

राष्ट्रवादी कॉंग्रेसला २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच विरोधात बसावे लागले. मात्र, पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव मिळावा, यासाठी पाच वर्षात पाच जणांना संदी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड पालिकेत आगामी विरोधी पक्षनेता कोण? राष्ट्रवादी कडून पाच जण इच्छुक
Who will be next Leader of opposition in Pimpri Chinchwad

पिंपरी  : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पाच जण इच्छुक आहेत. त्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याची उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच विरोधात बसावे लागले. मात्र, पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव मिळावा, यासाठी पाच वर्षात पाच जणांना संदी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार योगेश बहल, दत्ता साने व नाना काटे यांनी पद भूषविले आहे. काटे यांचा एक वर्षांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी नुकताच महापौर उषा ढोरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. आता अजित गव्हाणे, राजू मिसाळ, डॉ. वैशाली घोडेकर, विनोद नढे, संतोष कोकणे इच्छुक आहेत.

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला तोडीसतोड नेतृत्व असलेल्या व्यक्तीकडे विरोधी पक्षनेता पद देण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ""विरोधी पक्षनेता निवडीबाबत पक्षाची बैठक शनिवारी झाली. त्याचा अहवाल पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून सूचविलेले नाव नगरसचिवांकडे दिले जाईल. ते विभागीय आयुक्तांना कळवतील. त्यानंतर महापौर विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा करतील.''
Edited By- Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in