पिंपरी चिंचवडमध्ये ऑनर किलिंग; अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहर परिसर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. प्रेमप्रकरणातून एका युवकाचा लोखंडी रॉड आणि दगडांनी जबर मारहाण करुन खून करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ऑनर किलिंग; अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
six persons arrested for murder in pimpari chinchwad

पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथे विराज विलास जगताप (वय 20) या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

ही घटना रविवारी सात तारखेला रात्री दहाच्या सुमारास घडली. मुलीचे वडील, चुलते आणि सख्ख्या व चुलत भावांनी टेम्पोतून दुचाकीवर जात असलेल्या विराजचा पाठलाग सुरू केला. विराजच्या दुचाकीला त्यांनी टेम्पोने धडक दिली. विराज दुचाकीसह खाली पडल्यानंतर तो पळून जाऊ लागला. आरोपींना त्याचा पाठलाग करुन लोखंडी रॉडने आणि दगडाने त्याच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेत विराजला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सोमवारी दुपारी उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला. याप्रकरणी जितेश वसंत जगताप (वय 44)  यांनी फिर्याद दाखल केली आहे. विराज याचे जगदीश काटे याच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. यातून हा हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत. विराजचा खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि खुनाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करावी, अशा मागणी नातेवाईकांनी केल्या आहेत.

मास्क लावून धावणे-चालणेही टाळा,असला व्यायाम ठरेल घातक

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मास्क लावून सकाळच्या वेळी चालणाऱ्या आणि धावणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, मास्क लावून चालणे-धावणे जिवावरही बेतू शकते; त्यामुळे हा व्यायाम करू नये, असा सल्ला डॉक्‍टर देत आहेत. एन-95 सारखा मास्क लावून धावणे काय, चालणेही योग्य नसल्याचे पर्लमोकेअर रिसर्च ऍड एज्युकेशन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा मास्क लावून धावणे योग्य नसते. सर्जिकल किंवा कापडी मास्क लावून चालण्याचा व्यायाम करण्यास हरकत नाही; मात्र तेही 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त नसावे, असे ते म्हणाले. मास्क लावल्यावर श्‍वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे जास्त वेळ चालणे अथवा धावण्याने शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in