दादा,भाऊ सदस्यांत स्थायी समितीत 'का रे दुरावा?' - Rift Surfaced Between BJP's two MLa's Factions in PCMC | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

दादा,भाऊ सदस्यांत स्थायी समितीत 'का रे दुरावा?'

उत्तम कुटे
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची लागोपाठची दुसरी सभाही तहकूब केल्याने उपस्थित सदस्यांचा काल संताप झाला. त्याची परिणती एकाने पाण्याचा भरलेला काचेचा ग्लास भिरकाल्याने तो फुटण्यात झाली. दरम्यान, कालच्या घटनेनंतर या सभेतील भाऊ,दादा समर्थक सदस्यांतील दुरावा आणखी वाढल्याचे दिसले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची लागोपाठची दुसरी सभाही तहकूब केल्याने उपस्थित सदस्यांचा काल संताप झाला. त्याची परिणती एकाने पाण्याचा भरलेला काचेचा ग्लास भिरकाल्याने तो फुटण्यात झाली. दरम्यान, कालच्या घटनेनंतर या सभेतील भाऊ,दादा समर्थक सदस्यांतील दुरावा आणखी वाढल्याचे दिसले.

स्थायी समिती अध्यक्ष संतोष ऊर्फ अण्णा लोंढे या ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ते शहराचे कारभारी असलेले भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांचे समर्थक आहेत. तर, शहराचे दुसरे कारभारी आणि शहरातील भाजपचे दुसरे आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मणभाऊ यांच्या चिंचवड मतदारसंघातील त्यांचे तीन पाठीराखे सदस्य या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनीच सभा तहकूब झाल्याने नाराजी व्यक्त केली.त्यातील एकाने,तर ग्लास भिरकावला. अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या त्राग्यात आणखी भर पडली.आयुक्त श्रावण हर्डीकरही कामानिमित्त मुंबईला गेल्याने तेही या बैठकीला हजर नव्हते.

या समितीत शहराचे कारभारी असलेल्या भाजपच्या दोन्ही आमदार समर्थकांतील दुरावा याअगोदरही समोर आलेला आहे. त्यात आज भर पडली. सभा स्थगित करून नंतर विषय मंजुरीसाठी न येता फक्त अवलोकनासाठीच येत असल्याने टक्केवारीकरिता ओळखल्या जाणाऱ्या या  समितीतील सदस्यांत असंतोष असल्याचे समजते.गेल्या आठवड्याची सभा तहकूब झाली होती.आजचीही सभा कोरम नसल्याचे सांगून अध्यक्षांनी शुक्रवारपर्यंत (ता.६)ती स्थगित केली.त्यामुळे उपस्थित भाऊ समर्थक तीन सदस्य भडकले. 

धोरणात्मक निर्णय घेऊ नका, विषयांना मंजूरी देऊ नका, पण शहरातील तातडीच्या समस्यांवर चर्चा करण्याकरिता,तरी सभा होऊ द्या. नाही,तर शहरवासियांत चुकीचा संदेश जाईल, असे उपस्थित सदस्यांचे म्हणणे पडले. मात्र, ही मागणी विचारात न घेता सभा तहकूब केल्याने उपस्थित सदस्य संतापले आणि त्यानंतर काहीसा राडा झाला. जर,पुढील सभेत शुक्रवारी आमचे म्हणणे ऐकले नाही,तर पुन्हा उद्रेक होईल, असा इशारा आज उपस्थित असलेल्या तिघांपैकी एकाने या बैठकीनंतर 'सरकारनामा'शी बोलताना दिला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख