.....टोपे हे नगरविकास, तर शिंदे आरोग्यमंत्री होणार होते

टोपे आरोग्यमंत्री झाले आणि कोरोना आला. त्यामुळे आता राजेशभैय्यांचं कसं होणार अशी काहीशी चिंता वाटली. कुठून हे खातं मिळालं असं टोपेंनाही वाटलं असेल.पण,कोरोनानेच राज्याला कार्यक्षम आरोग्यमंत्री मिळाला, असे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले
.....टोपे हे नगरविकास, तर शिंदे आरोग्यमंत्री होणार होते
Rajesh Tope - Supriya Sule - Ekanath Shinde

पिंपरी : आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नगरविकासमंत्री होणार होते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्यखातं दिलं जाणार होतं. पण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा होऊन ऐनवेळी दोघांच्या खात्याची अदलाबदल झाली,असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल तळेगाव दाभाडे (ता.मावळ.जि.पुणे) येथे केला.

विधानपरिषद निवडणुकीच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पक्षाच्या प्रचार मेळाव्यात सुळे बोलत होत्या.टोपेंचा उल्लेख डॉक्टर असा केला जात असला,तरी ते डॉक्टर नसून इंजिनिअर आहेत, अशी दुसरी आश्चर्यकारक माहिती त्यांनी यावेळी दिली.त्या म्हणाल्या, टोपे आरोग्यमंत्री झाले आणि कोरोना आला. त्यामुळे आता राजेशभैय्यांचं कसं होणार अशी काहीशी चिंता वाटली. कुठून हे खातं मिळालं असं टोपेंनाही वाटलं असेल.पण,कोरोनानेच राज्याला कार्यक्षम आरोग्यमंत्री मिळाला. ऐनवेळी झालेला खातेबदल एकप्रकारे पथ्यावर पडला असेच म्हणावे लागेल.

राष्ट्रवादीचे पुणे पदवीधरमधील उमेदवार हे वयस्कर असल्याच्या भाजपकडून होत असलेल्या आरोपाचा खरपूस समाचार सुळेंनी यावेळी घेतला.पीएम नाही का सत्तरीचं,अशी उलट विचारणा त्यांनी केली.पवारसाहेब, तर ऐंशी वर्षाचे असूनही म्हणतात की "अभी,तो मैं जवान हूँ!कारण त्यांच्याकडे जनतेचं टॉनिक आहे. असं सुळे म्हणाल्या.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in