श्रावण हर्डीकर यांची बदली; राजेश पाटील पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त...

राज्य शासनाकडून शुक्रवारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून श्रावण हर्डीकर यांच्याबदलीची चर्चा सुरू होती.
श्रावण हर्डीकर यांची बदली; राजेश पाटील पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त...
Rajesh Patil is the new Commissioner of Pimpri Chinchwad

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली असून राजेश पाटील नवे महापालिका आयुक्त असतील. पाटील हे ओडिशा केडरचे अधिकारी असून प्रतिनियुक्तीने राज्यात आले आहेत. 

राज्य शासनाकडून शुक्रवारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. हर्डीकर यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क या पदावर बदली झाली आहे. पिंपरी चिंचवडचे नवे पालिका आयुक्त म्हणून राजेश पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 

जमाबंदी आयुक्त व भूमि अभिलेख संचालक एस. चोकलिंगम यांचीही बदली झाली आहे. त्यांच्याकडे यशदाच्या महासंचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झालेले एन. के. सुधांशु यांची जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख या पदावर नियुक्ती झाली आहे.

राज्याच्या अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या वर्धाच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. त्याचप्रमाणे शितल उगले-तेली यांची संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर आणि अनिता पाटील यांची राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in