शाळेच्या दाखल्यावर आईचे नाव आणल्याचाही झाला प्रचाराचा मुद्दा - Pune Teachers Constituency Unique Campaign | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

शाळेच्या दाखल्यावर आईचे नाव आणल्याचाही झाला प्रचाराचा मुद्दा

उत्तम कुटे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

आईचे नाव शाळेच्या दाखल्यावर आणले हा सुद्धा पु्णे शिक्षक मतदारसंघात प्रचाराचा मुद्दा झाला आहे. मुलांच्या संगोपनात वाटा कुणाचा या विचारलेल्या प्रश्नातून पाल्याच्या दाखल्यावर आईचे नाव प्रथमच आल्याचा दावा या पुणे शिक्षक मतदारसंघातील या अपक्ष प्राध्यापक उमेदवारांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.

पिंपरी : आईचे नाव शाळेच्या दाखल्यावर आणले हा सुद्धा पु्णे शिक्षक मतदारसंघात प्रचाराचा मुद्दा झाला आहे. मुलांच्या संगोपनात वाटा कुणाचा या विचारलेल्या प्रश्नातून पाल्याच्या दाखल्यावर आईचे नाव प्रथमच आल्याचा दावा या पुणे शिक्षक मतदारसंघातील या अपक्ष प्राध्यापक उमेदवारांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला. म्हणजे एका प्राध्यापकाचा हा प्रश्न त्यावेळी शिक्षणमंत्री असलेल्या प्रा.रामकृष्ण मोरे या दुसऱ्या प्राध्यापकांनी पैकीच्या पैकी मार्क देऊन सोडविला, असेच म्हणावे लागेल.

पुणे तेथे काय उणे असे प्रचाराच्या बाबतीतही आता म्हणावे लागेल. कारण पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघात शाळेच्या दाखल्यावर आईचे नाव आणून तिचा सन्मान केल्याचा वरील प्रचाराचा केलेले उमेदवार हे पुण्याचेच आहेत. प्रा. प्रकाश पवार असे त्यांचे नाव आहे. ते गेली २० वर्षे शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच दाखल्यावर आईचे नाव कसे आले,याचा किस्सा सांगितला. २००१ सालची ही घटना आहे. त्यावेळी प्रा. मोरे हे शिक्षणमंत्री, तर प्रा. पवार हे शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष होते. 

मुंबई विभागातील शिक्षक भरतीत काही अडचणी आल्याने  संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईत मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांना भेटावयास गेले होते. त्याप्रसंगी चर्चेदरम्यान बोलण्याच्या ओघात प्रा. पवार यांनी मुलांच्या संगोपनात वाटा कुणाचा असा प्रश्न थेट शिक्षणमंत्र्यांनाच केला.यामुळे हा कसला प्रश्न अशी उलट विचारणा करीत प्रा. मोरे संतप्त झाले. मात्र, लगेचच ते शांतही झाले. त्यांनी प्रा. पवार यांना चहाही दिला. त्यांच्याकडून प्रश्न व उत्तर समजावून घेतले.यानंतर यासंबधीचे म्हणणे तथा प्रस्ताव संघटनेच्या लेटरहेडवर पीएकडे देण्यास सांगितले. त्यानंतर सात दिवसांतच आईचेही नाव दाखल्यावर लावण्याचा जीआर निघाला,अशी आठवण प्रा. पवार यांनी सांगितली.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख