चंद्रकांतदादांची मानहानी रोखण्यासाठी भाजपचे मायक्रो प्लॅनिंग..... - PCMC BJP Trying Hard to Win Graduate Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

चंद्रकांतदादांची मानहानी रोखण्यासाठी भाजपचे मायक्रो प्लॅनिंग.....

उत्तम कुटे
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ही मतदार संपर्क मोहीम आज सुरु झाली. तर, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी २९ तारखेला मतदार महासंपर्क अभियान शहरात राबवले जाणार आहे.त्यात शहराचे दोन्ही कारभारी आमदार, पदाधिकारी सुद्धा सामील होणार असून ते प्रत्येकी पन्नास मतदारांना भेटणार आहेत

पिंपरी : आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या पूर्वीच्या मतदारसंघात हँटट्रिक नोंदवण्यासाठी पुणे पदवीधरमध्ये भाजप ईरेला पेटला आहे. त्यासाठी त्यांनी प्रचाराचेच नाही, तर मतदान तयारीचेही मायक्रो प्लँनिंग केले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक कार्यकर्ता हा पन्नास मतदारांना भेटून त्यांना कनव्हिंस करणार आहे. तसेच या मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढून त्यांचे मतदान करून घेण्याची जबाबदारीही या प्रत्येक कार्यकर्त्यावर सोपवण्यात आली आहे. 

या मतदारसंघातून पूर्वी चंद्रकांत पाटील निवडून आले होते. भाजपला या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करायची असल्याने ही निवडणूक हा या पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ही मतदार संपर्क मोहीम आज सुरु झाली. तर, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी २९ तारखेला मतदार महासंपर्क अभियान शहरात राबवले जाणार आहे.त्यात शहराचे दोन्ही कारभारी आमदार, पदाधिकारी सुद्धा सामील होणार असून ते प्रत्येकी पन्नास मतदारांना भेटणार आहेत,अशी माहिती पक्षाचे शहर सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी सरकारनामाला आज दिली. मतदार भेट अभियानासाठी शहरातील पक्षाच्या ५३० कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात आली आहे.त्यांनी आजपासून मतदारांशी संपर्क सुरु केला आहे. 

त्यांना प्रत्येकी पन्नास मतदारांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार ते त्यांना भेटून भाजपलाच मत द्या, असे सांगणार आहेत. एवढेच नाही, तर मतदानाच्या दिवशी या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची जबाबदारीही या प्रत्येक कार्यकर्त्याला पार पाडायची आहे, असे पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले. 

पुणे पदवीधरचे यापूर्वीचे आमदार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. ते येथून २००८ आणि २०१४ असे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. गतवर्षी ते विधानसभेला पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विजयी झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर ही निवडणूक होत आहे. 

त्यांनी आपली ही जागा टिकवून तेथे हॅटट्रिक नोंदवण्यासाठी स्वतः लक्ष घातले आहे. तर,यावेळी प्रथमच राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीचा सामना करावा लागत असल्याने भाजपने ही जागा व एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.त्यामुळे त्यांनी कसल्याही परिस्थिती शत विजय प्राप्त करण्यासाठी अत्यंत सुक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. त्यावर रक्ष ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक आमदार निरंजन डावखरे हे शहरात तळ ठोकून आहेत. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख