संदीप वाघेरेंचा भाजपला घरचा आहेर

पालिकेच्या भोसरी, आकुर्डी, थेरगाव आणि आकुर्डी येथील पालिका रुग्णालयाच्या मेडिकल गॅस पाईपलाईनच्या कामासाठी हे टेंडर काढले आहे. या कामात अनियमितता झाली असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड मधील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे
संदीप वाघेरेंचा भाजपला घरचा आहेर
PCMC Corporator Sandip Waghere Allege Irregularities in Tendering Process

पिंपरी : मेडिकल गॅस पाईपलाईनच्या २६ कोटी ६१ लाख रुपयांच्या टेंडरमध्ये अनियमितता झाली असून एक ठेकेदार नजरेसमोर ठेऊन ही टेंडरप्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी करून घरचा आहेर दिला. कुठल्याही गटाशी सबंध नसलेले बेधडक वाघेरे यांनी यापूर्वीही असाच आवाज अनेकदा उठवलेला आहे.

पालिकेच्या भोसरी, आकुर्डी, थेरगाव आणि आकुर्डी येथील पालिका रुग्णालयाच्या मेडिकल गॅस पाईपलाईनच्या कामासाठी हे टेंडर काढले आहे. त्यातील अनियमिततेला पालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.पवन साळवे व भांडारप्रमुख मंगेश चितळे हे जबाबदार असल्याचा आरोप वाघेरे यांनी केला आहे. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

विरोधी नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पालिका वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला. या टेंडरमधील अट ही अॅटलस कॉपको ही एकच कंपनी पूर्ण करू शकेल, अशी असल्याचे वाघेरेंचे म्हणणे आहे. निकोप स्पर्धा न होता फक्त विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून हे रिस्ट्रीक्टेड टेंडर काढल्याचा त्यांचा दावा आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in