पिंपरीत मेट्रो धावली सहा किमीचे अंतर
Metro

पिंपरीत मेट्रो धावली सहा किमीचे अंतर

वर्षभरापूर्वी एक किलोमीटर धावलेल्या मेट्रोची आज सहा किलोमीटरपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरी चाचणी झाली.पीसीएमसी ते फुगेवाडी या स्थानकांदरम्यान मेट्रो धावली.

पिंपरीःवर्षभरापूर्वी एक किलोमीटर धावलेल्या मेट्रोची आज सहा किलोमीटरपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरी चाचणी झाली.पीसीएमसी ते फुगेवाडी या स्थानकांदरम्यान मेट्रो धावली. हे अंतर कापायला तिला अर्धा तास लागला.दरम्यान, पुणे मेट्रोचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून लॉकडाऊननंतर आता ते आणखी वेगात सुरु आहे.

१० जानेवारी २०२० ला पीसीएमसी ते संत तुकारामनगर दोन स्थानकांदरम्यान १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. कोरोनामुळे ६ ते ७ महिने मेट्रोच्या कामाचा वेग मंदावला होता. तरीदेखील हा महत्वपूर्ण टप्पा मेट्रोने आज पूर्ण केला. चेतन फडके हे या तीन डब्याच्या मेट्रो ट्रेनचे ऑपरेटर होते. 

कालची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ असून पिंपरी-चिंचवडकरांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित  यांनी या चाचणीनंतर सांगितले. सध्या पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी  या दोन मार्गिकांमध्ये  व्हायाडक्ट , स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स  येथील डेपो उभारण्याचे काम देखील  प्रगतीपथावर आहे.
Edtied By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in