उद्याच्या भारत बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष व कामगार संघटना सहभागी होणार - All Parties Except BJP will participate in Bharat Bandh to support Farmers agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

उद्याच्या भारत बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष व कामगार संघटना सहभागी होणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

नवे कामगार कायदे मागे घेण्यासाठी पुकारण्यात आलेल्या उद्याच्या भारत बंदमध्ये भाजप वगळता पिंपरी चिंचवडमधील सर्व राजकीय पक्ष व कामगार संघटना सहभागी होणार आहेत.कामगार काळे झेंडे घेऊन दिवसभर निदर्शने करणार असल्याचे  कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ कैलास कदम यांनी सांगितले.

पिंपरी : नवे कामगार कायदे मागे घेण्यासाठी पुकारण्यात आलेल्या उद्याच्या भारत बंदमध्ये भाजप वगळता पिंपरी चिंचवडमधील सर्व राजकीय पक्ष व कामगार संघटना सहभागी होणार आहेत.कामगार काळे झेंडे घेऊन दिवसभर निदर्शने करणार असल्याचे  कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ कैलास कदम यांनी सांगितले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. त्याला समिती आणि शहरातील राजकीय पक्षांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन काल समर्थन दिले. समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक मारुती भापकर, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते दिलीप पवार,काशीनाथ नखाते, गणेश दराडे, युवराज दाखले, क्रांतीकुमार कडूलकर आदी यावेळी उपस्थित होते.

चाबुकस्वार म्हणाले की, नवीन कामगार कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागून शेती भांडवलदारांच्या हातात जाणार आहे. शेतक-यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी बंदमध्ये सामील व्हा,असे आवाहन वाघेरे यांनी केले.तर, बँका, एअरपोर्ट खाजगीकरणानंतर आता अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असणा-या शेतकरी आणि कामगारांचे अस्तित्वच या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांमुळे संपुष्टात येणार आहे,अशी भीती कांबळे यांनी व्यक्त केली.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख